शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
2
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
3
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
4
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
6
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
7
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
8
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
9
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
10
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
11
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
12
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
13
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
14
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
15
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
16
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
17
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
18
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
19
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका
20
मनोज जरांगे-पाटील यांना तात्काळ अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे मागणी

इमारत करात मिळणार सवलत

By admin | Updated: January 3, 2017 02:36 IST

राज्य सरकारच्या १९७९ च्या निर्णयानुसार निवासी इमारतीचे क्षेत्रफळ १५० चौरस मीटरपेक्षा अधिक असेल

मनपाच्या कर विभागाचा निर्णय : तीन लाख नागरिकांना दिलासा नागपूर : राज्य सरकारच्या १९७९ च्या निर्णयानुसार निवासी इमारतीचे क्षेत्रफळ १५० चौरस मीटरपेक्षा अधिक असेल आणि ज्या मालमत्ताचे वार्षिक भाडे १५०० रुपयाहून पेक्षा अधिक असेल, अशा निवासी इमारतीवर १० टक्के इमारत कर आकारला जातो. यात प्रामुख्याने गरीब व मध्यमवर्गीयांचा समावेश आहे. या करदात्यांना दिलासा देण्यासाठी २०० चौरस मीटरपर्यंतच्या निवासी बांधकामावर मोठ्या निवासी इमारत कर सूट देण्याचा निर्णय महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन समितीने घेतला आहे. या निर्णयाचा शहरातील तीन लाख नागरिकांना दिलासा मिळणार आहे. यासोबतच २०१ ते ३०० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या निवासी इमारतीला ३ टक्के, ३०१ ते ५०० चौ. मी. पर्यत ५ टक्के तर ५०० चौरस मीटरहून अधिक निवासी बांधकाम असलेल्या इमारतीवर १० टक्के दराने मोठ्या निवासी इमारत कर आकारण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे, अशी माहिती समितीचे सभापती गिरीश देशमुख यांनी सोमवारी दिली. नागपूर शहरात ५ लाख ४५ हजार २५१ मालमत्तावर कर आकारणी केली जाते. यातील ६० ते ७० टक्के लोकांचे निवासी बांधकाम २०० चौरस मीटरच्या आत आहे. नवीन इमारत कर आकारण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. शासन मंजुरीनंतर या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. नोटाबंदीच्या कालावधीत ६६,७३४ मालमत्ता धारकांनी थकीत कर जमा केला. विशेष म्हणजे यात १९७०-७१ सालापासूनचा थकीत कर भरणाऱ्यांचा समावेश आहे. जुन्या नोटांच्या माध्यमातून मालमत्ता कराची २९ कोटी ३५ लाखांची वसुली झाली आहे. डिसेंबरअखेरीस मालमत्ता कराच्या स्वरुपात ११५ कोटी ६५ लाख वसूल करण्यात आले. गेल्या वर्षाच्या तुलनेत झालेली वसुली २ क ोटी ६५ लाखांनी अधिक आहे. एलबीटीतून ४६१ कोटी तर बाजार शुल्कातून ४ कोटी ५९ लाखांचा महसूल जमा झाला आहे. नोटाबंदीच्या अखेरच्या तीन दिवसात २९ ते ३१ डिसेंबर यादरम्यान ४.५९ कोटींची वसुली झाली आहे. परंतु नोटाबंदीच्या कालावधीत २९.३५ कोटींची वसुली होऊ नही वसुलीचे उद्दिष्ट गाठणे अशक्य असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी) शासन मंजुरीनंतर अशी होईल कर आकारणी निवासी बांधकाम प्रस्तावित इमारत कर २०० चौ. मी. निरंक २०१ ते ३०० चौ.मी. ३ टक्के ३०१ ते ५०० चौ.मी. ५ टक्के ५०० चौ.मी.पेक्षा अधिक १० टक्के उद्दिष्ट व जमा झालेला महसूल कराचे स्वरुप उद्दिष्ट(कोटी) वसुली(डिसेंबरपर्यंत) एलबीटी ७५० ४६१ मालमत्ता ३०६ ११५.६५ बाजार शुल्क ७.५५ ४.५९ एकूण १०६३.५५ ५८१.२४