शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

नकली सोने देऊन असली लंपास

By admin | Updated: July 23, 2016 03:21 IST

सोन्याच्या हव्यासापायी एका महिलेला आपल्या अंगावरील ८० हजाराचे असली सोने गमावण्याची वेळ आली.

आंतरराज्यीय टोळी सक्रिय : महिलेला ८० हजाराने फसविले नागपूर : सोन्याच्या हव्यासापायी एका महिलेला आपल्या अंगावरील ८० हजाराचे असली सोने गमावण्याची वेळ आली. ही घटना अजनी पोलीस ठाणे परिसरात घडली. या घटनेमुळे शहरात नकली सोने देऊन लुटणारी टोळी सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. जुना सुभेदार ले-आऊट येथील रहिवासी असलेल्या ४८ वर्षीय आरती बेरी यांचे अजनी येथे डेली निड्सचे दुकान आहे. गुरुवारी सकाळी १०.२० वाजताच्या सुमारास २४ वर्षाचा एक तरुण त्यांच्या दुकानात आला. तो जमीन खोदण्याचे काम करीत असल्याचे त्याने सांगितले. जमीन खोदत असतांना दागिने सापडल्याचे सांगितले. बहिणीचे लग्न असल्याने हे दागिने विकून देण्याची विनंती केली. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आरती यांनी त्याला दागिने आणून दाखवण्यास सांगितले. त्या तरुणाने आरती यांना एक चेन दिली. तेव्हा ओळखीच्या सोनाराकडून तपासल्यानंतरच दागिने विकून देईल, असेही सांगितले. त्या तरुणाने दहा-वीस हजार रुपये मागितले. परंतु सध्या आपल्याजवळ पैसे नसल्याचे त्यांनी सांगितले. तेव्हा गँरटी म्हणून युवकाने आरती यांना त्यांची सोनसाखळी मागितली. त्याच्या आमिषाला बळी पडून त्यांनी सोनसाखळी व दोन सोन्याच्या अंगठ्या (अंदाजे किमत ८० हजार रुपये )सुद्धा त्या युवकाला दिल्या. थोड्या वेळात परत येत असल्याचे सांगून तो फरार झाला. आरती यांनी जेव्हा त्या तरुणाने दिलेली चेन सोनाराकडून तपासून घेतली. तेव्हा ती नकली असल्याचे आढळून आले. यानंतर त्यांनी अजनी ठाण्यात तक्रार दाखल केली. त्या युवकाने आरती यांना एकदा फोन सुद्धा केला होता. त्याच्या मोबाईल नंबरच्या आधारावर तो राजस्थान येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे नकली सोने देऊन लुटणारी आंतराज्यीय टोळीचा तो सदस्य असावा, असा पोलिसांना संशय आहे.(प्रतिनिधी)