शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज राहा : जिल्हाधिकारी अश्विन मुदगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 23:02 IST

मान्सूनपूर्व तयारीची सुरुवात जिल्हा प्रशासनाने सुरु केली असून आपत्ती व्यवस्थापनाची आढावा बैठक मंगळवारी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी घेतली. आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित साधनसामुग्री तयार ठेवावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक इमारती व पुलांची पाहणी करुन अहवाल देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

ठळक मुद्दे धोकादायक इमारती व पुलांची पाहणी करून अहवाल द्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मान्सूनपूर्व तयारीची सुरुवात जिल्हा प्रशासनाने सुरु केली असून आपत्ती व्यवस्थापनाची आढावा बैठक मंगळवारी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी घेतली. आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित साधनसामुग्री तयार ठेवावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक इमारती व पुलांची पाहणी करुन अहवाल देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.गेल्या वर्षी ६ जुलैला झालेल्या पावसामुळे आपत्ती व्यवस्थापन करताना आलेल्या अडचणींचा अभ्यास करुन यावर्षी अतिपावसाची परिस्थिती निर्माण झाल्यास विभागांनी सज्ज राहावे. आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रत्येक विभागाने नोडल अधिकारी नेमावा. त्या अधिकाऱ्याचे नाव, मोबाईल क्रमांकासह सर्व माहिती जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षास द्यावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षासाठी करण्यात आलेल्या तयारीचे सादरीकरण आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे यांनी केले. नागपूर जिल्ह्यात एकूण ३४१ गावे पूरप्रवण परिस्थिती असलेली आहेत. गेल्या वर्षी ६ जुलैला २८३ मि. मी. एवढा पाऊस तीन ते चार तासात पडला, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, ढगफुटीसारख्या घटनांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाची सर्व तयारी अद्ययावत साधनसामुग्रीसह तयार असावी. आपत्ती व्यवस्थापनाच्या संबंधी साधनसामुग्री दुरुस्ती आवश्यक असल्यास निधीची मागणी करावी. निधी तातडीने उपलब्ध करुन देता येईल. यावेळी आपत्ती व्यवस्थापन प्रक्रियेतील संबंधित २२ विभागांच्या कार्य वाटपाबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी चर्चा केली. मनपाने मान्सूनपूर्व नाले साफसफाई करावी. क्षेत्रीय कार्यालयात बोटी, लाईफ जॅकेट यासह आवश्यक ती साधन सामुग्री आहे किंवा नाही याची खातरजमा तहसीलदारांनी करावी. तसेच पाणी साचल्यानंतर साथीचे आजार पसरु नये म्हणून आरोग्य विभागाने पुरेसा कर्मचारी वर्ग व औषधसाठा तयार ठेवावा, विद्युत विभागाने वाढलेल्या झाडांच्या फांद्या तोडणे तसेच वाकलेले पोल सरळ करणे, प्रादेशिक परिवहन कार्यालयाने अपघातप्रवण स्थळी सूचना द्याव्यात. तसेच आणीबाणी प्रसंग उद्भवल्यास तालुक्याला हेलिकॉप्टर उतरविण्यासाठी हेलिपॅड तयार करण्यासाठी लागणाऱ्या जागेची पाहणी करावी, आदी निर्देश यावेळी देण्यात आले. यावेळी आपत्ती व्यवस्थापन आराखडा २०१९ या पुस्तिकेचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी इतर विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत लोकार्पण केले. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे, उपजिल्हाधिकारी महसूल सुजाता गंधे, विभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वय अधिकारी नितेश भांबोरे यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. १ जूनपासून जिल्हा नियंत्रण कक्ष १ जूनपासून जिल्हा नियंत्रण कक्ष कार्यान्वित होणार आहे. टोल फ्री क्रमांक १०७७ आणि दूरध्वनी क्रमांक ०७१२-२५६२६६८ असा आहे. नियंत्रण कक्षात नियुक्त करण्यात येणाऱ्याअधिकारी कर्मचाऱ्यांची अद्ययावत यादी तातडीने आपत्ती व्यवस्थापन कक्षात द्यावी, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. 

टॅग्स :Nagpur Collector Officeनागपूर जिल्हाधिकारी कार्यालय