शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वकिलीतील शिखर गाठण्यासाठी परिश्रम आवश्यक : न्या. रोहित देव यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 23:37 IST

वकिली व्यवसायात यशाचे शिखर गाठण्यासाठी अथक परिश्रम घेणे आवश्यक आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती रोहित देव यांनी बुधवारी नवोदित वकिलांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.

ठळक मुद्देनवोदित वकिलांना मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वकिली व्यवसायात यशाचे शिखर गाठण्यासाठी अथक परिश्रम घेणे आवश्यक आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती रोहित देव यांनी बुधवारी नवोदित वकिलांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरच्या वतीने स्टडी सर्कल उपक्रमांतर्गत न्या. देव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. ‘नवोदित वकिलांनी काय करावे व काय करू नये आणि नवोदित वकिलांकडून न्यायालयाला असलेल्या अपेक्षा’ हा व्याख्यानाचा विषय होता. सुरुवातीचे अडथळे पार करून यशाचे शिखर गाठण्यापर्यंत प्रवास अतिशय सुंदर असतो. परंतु, ही अनुभूती प्रत्येकाला मिळत नाही. त्यासाठी लक्ष्य ठरवून कृती करावी लागते. तसेच, वकिलामध्ये जिद्द, परिश्रम व समर्पण भावना आवश्यक असते. प्रत्येक न्यायमूर्ती वकिलांच्या विकासाचा विचार करीत असतात. त्यांना शिकण्याची संधी देत असतात. वकिलांनी त्या संधीचे सोने करायला हवे, असे न्या. देव यांनी सांगितले.वकिलांनी पक्षकार, न्यायमूर्ती व न्यायदान व्यवस्थेसोबत नेहमी प्रामाणिक असायला हवे. ज्ञानार्जन व संशोधनाकरिता त्यांनी केवळ संगणकावर अवलंबून राहू नये. कायद्याची पुस्तके व कॉमेंट्रीचा सखोल अभ्यास करावा, असेही न्या. देव यांनी सांगितले. हे व्याख्यान उच्च न्यायालयाच्या सभागृहात झाले. संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर यांनी न्या. देव यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. उपाध्यक्ष अ‍ॅड. पुरुषोत्तम पाटील यांनी प्रास्ताविक केले तर, अ‍ॅड. प्रफुल्ल खुबाळकर यांनी आभार मानले.

 

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयadvocateवकिल