शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
6
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
7
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
8
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
9
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
10
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
11
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
12
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
13
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
14
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
15
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
16
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
17
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
18
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
19
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
20
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

विदर्भात कोरोनाचा पुन्हा उद्रेक; भीती गेली, उपाययोजनांचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 10:32 IST

Nagpur News गेल्या काही दिवसात विदर्भातील अमरावती, अकोला, भंडारा, वर्धा, यवतमाळ व नागपूर या प्रमुख शहरांत वेगाने कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. अमरावतीत तर रविवारी ३९९ पॉझिटिव्ह निघाले असून तिघांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देजनता-प्रशासन दोघेही जबाबदार

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गेल्या काही दिवसात विदर्भातील अमरावती, अकोला, भंडारा, वर्धा, यवतमाळ व नागपूर या प्रमुख शहरांत वेगाने कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. अमरावतीत तर रविवारी ३९९ पॉझिटिव्ह निघाले असून तिघांचा मृत्यू झाला.अमरावती जिल्ह्यात कोरोना संक्रमितांच्या आकडेवारीने कहर केला आहे. रविवारी पुन्हा ३९९ पॉझिटिव्ह आले, तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत २५ हजार २९४ संक्रमितांची नोंद झाली, तर मृतांची संख्या ४३५ झाली आहे. १० फेब्रुवारीपासून सातत्याने तीन शतकी रूग्णसंख्येने अमरावतीकरांमध्ये भीती व्यक्त होत आहे.त्रिसूत्रीचे पालन विसरलेकोरोना लस येताच, नागरिक त्रिसूत्रीचे पालन करणे विसरले आहेत. केवळ ५ ते १० टक्केच नागरीक मास्कचा वापर करतात. शारीरिक अंतराचे पालन कुठेही दिसून येत नाही. बाजारपेठेतील गर्दी बघता, कोरोनाचा स्फोट होण्याच्या दिशेने ही वाटचाल सुरू झाली आहे. नियमित हात धुणे तर आता बंदच झाले आहे. कोरोना वाढीस बहुधा नागरिक जबाबदार असल्याचे एकंदर चित्र आहे.नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. रविवारी तपासण्यात आलेल्या एकूण नमुन्यांपैकी १३.६ टक्के नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. शनिवारी हे प्रमाण १०.२९ टक्के इतके होते. रविवारी जिल्ह्यात ४५५ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, तर सहाजणांचा मृत्यू झाला. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने फेब्रुवारी महिन्यात सक्रिय रुग्णांची संख्या पहिल्यांदा ४ हजारांवर पोहोचली आहे. आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनासाठी ही चिंतेची बाब आहे.यवतमाळ जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना संक्रमणाचा वेग वाढला आहे. शनिवारी ११९ नवे रुग्ण आढळल्यानंतर लगेच रविवारीही तब्बल ११५ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांचा आकडा चक्क ६०१ एवढा झाला आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस