शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीत आता आरसी झाली पुन्हा ‘स्मार्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 21:19 IST

तब्बल तीन वर्षांपासून पूर्वीप्रमाणेच कागदावर छापून देण्यात येणाऱ्या  वाहन नोंदणीपुस्तकाला (आरसी बुक) पुन्हा एकदा स्मार्ट कार्डचे स्वरूप देण्यात आले आहे.

ठळक मुद्देशहर आरटीओ कार्यालयातून सुरुवाततीन वर्षानंतर पेपर आरसीची कटकट थांबली

आॅनलाईन लोकमतनागपूर : तब्बल तीन वर्षांपासून पूर्वीप्रमाणेच कागदावर छापून देण्यात येणाऱ्या  वाहन नोंदणीपुस्तकाला (आरसी बुक) पुन्हा एकदा स्मार्ट कार्डचे स्वरूप देण्यात आले आहे. याचा शुभारंभ  बुधवारपासून शहर आरटीओ कार्यालयातून होणार आहे. विशेष म्हणजे, पूर्वी या स्मार्ट कार्डचे ३९४ रुपये मोजावे लागायचे आता २०० रुपये मोजावे लागणार आहे.परिवहन विभागाने कागदी पुस्तिकेच्या स्वरूपातील ‘आरसी बुक’ला २००६ मध्ये ‘स्मार्ट कार्ड’चे स्वरूप दिले. परंतु जून २०१४ मध्ये स्मार्टकार्ड पुरवठादाराचे कंत्राट संपले. परिणामी, डिसेंबर २०१४ पासून नव्याने नोंदणी होणाऱ्या  वाहनांना जुन्या स्वरूपातील कागदी पुस्तिकेच्या स्वरूपातील आरसी बुक देणे सुरू झाले. विशेष म्हणजे, आरटीओकडे आधीच तोकडे मनुष्यबळ यात या नव्या कामाची भर पडल्याने आणि वेळोवेळी आरसी कागदाचा (प्री प्रिंटर स्टेशनरी) तुटवडा पडत राहिल्याने प्रलंबित आरसीची समस्या वाढली होती. आरसी बाळगताना कागदापेक्षा स्मार्ट कार्ड सोईस्कर आणि कागदाच्या तुलनेत टिकाऊ असल्याने नागरिकांकडून कागदाच्या आरसीबाबत नाराजी व्यक्त केली जात होती. या परिस्थितीवर मात करण्यासाठी परिवहन विभागाने पुन्हा ‘स्मार्ट आरसी‘ सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्याची अंमलबजावणी आता नागपूर शहर आरटीओ कार्यालयातून होत आहे.शुल्क झाले कमीपरिवहन विभागाने ‘आरसी’चे ‘स्मार्ट कार्ड’ बनविण्याचे काम ‘रोजमर्टा टेक्नोलॉजीस लि.’ कंपनीला दिले आहे. या कंपनीला प्रति स्मार्ट कार्डमधून सुमारे ५४ रुपये ७२ पैसे मिळतील. शिवाय कंपनीला वाहन १.० प्रणालीमधून वाहन ४.० प्रणालीमध्ये डेटा रूपांतरित करावा लागणार आहे. पूर्वी या स्मार्ट कार्डचे ३९४ रुपये मोजावे लागायचे आता २०० रुपये मोजावे लागणार आहे.‘स्मार्ट कार्ड’साठी करावा लागणार अर्जज्या वाहनधारकांकडे ‘पेपर आरसी’ आहे आणि त्यांना ‘स्मार्ट कार्ड’ हवे आहे त्यांना कार्यालयात दुय्यम आरसीसाठी अर्ज करावा लागेल. यात कारसाठी ३०० रुपये तर दुचाकी वाहनासाठी १५० रुपये शुल्कासह स्मार्टकार्डचे २०० रुपये भरावे लागतील.पेपर आरसीही वैधशहर कार्यालयाने स्मार्टकार्ड देणे सुरू केले असले तरी जुने ‘पेपर आरसी’ वैध राहील. लवकरच पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातूनही स्मार्टकार्डची योजना सुरू होईल.शरद जिचकारप्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर शहर

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस