शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
2
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
3
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
5
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
6
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
7
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
9
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
10
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
11
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
12
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
13
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
14
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
15
आता पहिलीपासूनच शिका शेती; शालेय अभ्यासक्रमात टप्प्याटप्प्याने कृषी विषयाचा समावेश
16
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
17
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
18
चिंताजनक ‘लडाख फाइल्स’! सोनम वांगचुक यांना देशद्रोही ठरवून तुरुंगात सडविणे दिसते तितके सोपे नाही
19
ट्रम्प, जिमी किमेल आणि गुदगुल्यांचा ‘खंजीर’! ही एकी जगभरातील माध्यमांसाठी एक संदेशच...

बँकिंग क्षेत्रात रिझर्व्ह बँक हस्तक्षेप करीत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 12:55 IST

देशातील बँकांच्या आर्थिक व्यवहारात रिझर्व्ह बँक कधीच हस्तक्षेप करीत नसल्याचे मत भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देभारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यांचे मतबँकिंग रेग्युलेशन अ‍ॅक्ट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय रिझर्व्ह बँक देशातील बँकांचे आर्थिक धोरण ठरविते आणि पैलू पाहते व शिस्त लावते. सुरक्षित आर्थिक व्यवहारासह ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित राहाव्यात याकडे लक्ष देते. नागरी बँकांना आर्थिक परवाना देते. देशातील बँकांच्या आर्थिक व्यवहारात रिझर्व्ह बँक कधीच हस्तक्षेप करीत नसल्याचे मत भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यांनी व्यक्त केले. रिझर्व्ह बँकेने उत्कर्ष-२०२२ धोरण जाहीर केल्याचे त्यांनी सांगितले.सहकार भारतीय, महाराष्ट्र प्रदेशतर्फे महाराष्ट्रातील सर्व नागरी सहकारी बँकांचे अधिवेशन शेगांव येथे ४ व ५ ऑगस्टला होणार आहे. सतीश मराठे सहकार भारतीचे संस्थापक सदस्य आहेत. अधिवेशनाच्या बैठकीसाठी नागपुरात आले असता त्यांनी लोकमतशी संवाद साधला.मराठे म्हणाले, रिझर्व्ह बँकेने नागरी बँकांसाठी व्हिजन डाक्युमेंट तयार केले आहे. बँकांची व्याप्ती, कार्य निष्पादन आदींसह विविध मार्गदर्शक तत्त्वांचा त्यात समावेश आहे. याकरिता समिती तयार करण्यास रिझर्व्ह बँकेने सुचविले आहे. यामुळे नागरी बँकांची दिशा ठरणार आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर वाढले. शिवाय लोकांना उत्तम सेवा मिळून नागरी बँकांचे सक्षमीकरण होणार आहे.राष्ट्रीयीकृत बँकासारखेच रिस्क मॅनेजमेंट, एचआर पॉलिसी, स्कील सेट, इन्व्हेस्टमेंट पॉलिसी, सायबर सिक्युरिटी तसेच बँक व ग्राहकांच्या दृष्टीने सर्वसमावेशक धोरण नागरी सहकारी बँकांमध्ये असावे.मराठे म्हणाले, रिझर्व्ह बँकेने १५ वर्षांत नवीन नागरी बँक सुरू होण्यासाठी आर्थिक परवाना दिलेला नाही. देशाच्या लोकसंख्येनुसार नागरी बँकांना आर्थिक परवाना देण्याची गरज आहे. दोन वर्षांपासून नागरी सहकारी बँकांना शेड्युल बँकेचा दर्जा मिळालेला नाही. तोसुद्धा मिळाला पाहिजे.राज्य आणि केंद्राच्या योजना उदा. केंद्राची सुकन्या योजना राष्ट्रीय बँकांप्रमाणे नागरी बँकांमध्ये राबविण्याची गरज आहे.शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली तेव्हा जिल्हा बँका आणि राष्ट्रीयीकृत बँकांना शासनाने परतावा दिलेला आहे. हा परतावा अजूनही नागरी बँकांना शासनाने दिलेला नाही.लघु उद्योजकांना नागरी बँका कर्ज देतात. ते कर्ज बुडवितात तेव्हा विम्याचे संरक्षण मिळत नाही. याकरिता पुढाकार घेणार असल्याचे मराठे यांनी स्पष्ट केले.बँकिंग रेग्युलेशन अ‍ॅक्ट नागरी बँकांसाठी लागू असावाबँकिंग रेग्युलेशन अ‍ॅक्ट विशेष आहे. तो नागरी बँकांसाठी लागू करण्याची गरज असल्याचे मराठे यांनी सांगितले. यावर भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागरी बँकांवर रिझर्व्ह बँक आणि सहकार खात्याचे नियंत्रण आहे. सर्व अधिकार रिझर्व्ह बँकेला दिल्यास नागरी सहकारी बँकांच्या व्यवहारावर नियंत्रण आणि व्यवहारात नियमितता येईल. रिझर्व्ह बँकेला खासगी बँकांच्या मर्जिंगचे अधिकार आहेत. खासगी बँकेचा सीईओ, एमडी आणि संचालकांना बदलण्याचे अधिकार रिझर्व्ह बँकेला आहेत. देशात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि स्थानिक स्तरावर बँका हव्याच. मेक इन इंडिया योजनेतही सहकारी बँकांना केंद्र सरकारने जोडावे. अम्बेला ऑर्गनायझेशनला रिझर्व्ह बँकेला मंजुरी दिल्याचे मराठे यांनी सांगितले. चर्चेदरम्यान सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री उदय जोशी, अधिवेशन प्रमुख सुभाष जोशी, संयोजक आशिष चौबिसा आणि समन्वयक विवेक जुगादे उपस्थित होते.

टॅग्स :bankबँक