शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कच्चा माल महाग, उद्योगांवर संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:06 IST

नागपूर : गेल्या काही दिवसात स्टील आणि स्टील संबंधित अन्य कच्च्या मालाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्याचा थेट ...

नागपूर : गेल्या काही दिवसात स्टील आणि स्टील संबंधित अन्य कच्च्या मालाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्याचा थेट परिणाम उद्योगांवर पडला आहे. दरवाढीमुळे एमएसएमई क्षेत्राला होणाऱ्या अडचणींपासून बाहेर काढण्यासाठी चिंतित उद्योगांनी हस्तक्षेप करण्याची सरकारकडे मागणी केली आहे.

या विषयावर विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या सभागृहात संयुक्त कृती समितीची बैठक पार पडली. या बैठकीत विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन (व्हीआयए), बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (बीएमए), एमआयए इंडस्ट्रीज असोसिएशन (एमआयए), सीआयआय, लघु उद्योग भारती, कळमेश्वर इंडस्ट्रीज असोसिएशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.

उद्योजक म्हणाले, स्टीलच्या किमतीत १८ हजारांची वाढ होऊन ५५ हजार रुपये टन, आयरन ओर ३ हजारांहून ६ हजार रुपये टन, तांबे ४.५ लाखांहून ८.८० लाख रुपये टन, पीव्हीसी रेजिन ६० हजारांहून १.४० लाख रुपये टन, नायट्रिक अ‍ॅसिड ९ हजारांहून २१ हजार रुपये टनावर गेल्या आहेत. दरवाढीची स्थिती पुढेही कायम राहिल्यास त्याचा आत्मनिर्भर भारत अभियानावर प्रतिकुल परिणाम होणार आहे. कोरोनाचा महामारीचा परिणाम अजूनही उद्योगांवर दिसून येत आहे. त्यातच कच्च्या मालाच्या किमतीत वाढ होत आहे. त्यामुळे ऑर्डर रद्द होत आहेत आणि विक्रीबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. निर्यातीवर परिणाम होण्याची चिंता व्यक्त करण्यात येत आहे. याच कारणामुळे उद्योजकांनी केंद्रीय एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे दरवाढीवर मत मांडले आहे.

उद्योजक म्हणाले, विदर्भात प्रामुख्याने एमएसएमई क्षेत्र कार्यरत असून दरवाढीच्या प्रतिकूल परिणामाचा संपूर्ण अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम होणार आहे. या क्षेत्रात उत्साह संचारण्यासाठी सरकारला आवश्यक पावले उचलण्याची गरज आहे. कच्च्या मालाच्या किमती वाढल्यानंतरही पुरेशा माल उद्योगांना मिळत नाही. त्यापासून तयार होणाऱ्या फिनिश वस्तूंचे दरही वाढले आहेत. विशेषत: इलेक्ट्रिकल स्टील, पीव्हीसी, आयरन ओर, स्टील स्क्रॅप आदी कच्च्या मालाची किंमत वाढल्याने उद्योगांची गुंतवणूक वाढली आहे. रोकडअभावी उद्योगांना काम करणे कठीण झाले आहे. अन्य देशातून कच्च्या मालाची आयात व्हायची तेव्हा किमतीत आटोक्यात होत्या. पण आता त्यावर प्रतिबंध लागल्याने देशांतर्गत किमती अचानक वाढल्या आहेत. त्यामुळे जागतिक बाजाराच्या स्पर्धेत फिनिश मालाची किमतीतही वाढ झाली आहे. त्यामुळे निर्यात पूर्णपणे प्रभावित झाली आहे.

बैठकीत सुरेश राठी, अतुल पांडे, चंद्रशेखर शेगावकर, प्रदीप खंडेलवाल, नितीन लोणकर, राहुल दीक्षित, श्रीकांत धोंड्रीकर आणि अन्य उद्योजक उपस्थित होते.