सोपान पांढरीपांडे नागपूरराजेश जोशीद्वारे संचालित देवनगर येथील रविराज समूहाविरुद्ध धंतोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर उपराजधानीतील आणखी एक आर्थिक घोटाळ््याचे बिंग फुटले आहे. गेल्या तीन वर्षात शहरामध्ये अशाप्रकारचे पाच मोठे घोटाळे समोर आले आहेत. तीन वर्षांअगोदर प्रमोद अग्रवालच्या महादेव लॅन्ड डेव्हलपर्स आणि कळमना मार्केट क्रेडिट को-आॅपरेटिव्ह सोसायटीने गुंतवणूकदारांचे ३०० कोटी थकविल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. २०१२ साली जयंत आणि वर्षा झामरे यांनी अशाच प्रकारे गुंतवणूकदारांना १०० कोटींचा गंडा घातल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. २०१३ साली समीर जोशीच्या श्रीसूर्या समूहाचे नाव २५० कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यात समोर आले आणि काही काळानेच प्रशांत वासनकरच्या वासनकर समूहाने १५०० कोटी रुपयांच्या ठेवी बुडविल्याचा सर्वात मोठा आर्थिक घोटाळा समोर आला. प्रमोद अग्रवाल, वर्षा आणि जयंत झामरे, समीर आणि पल्लवी जोशी यांना पोलिसांनी अटक केली होती. वासनकरलादेखील कधीही अटक होऊ शकते. या सर्व घोटाळ््यानंतर आता रविराज समूहाची पाळी आहे.रविराज समूहाचा चेअरमन राजेश जोशीसोबत कुठलाही संपर्क होत नसून देवनगर येथील घर व कार्यालय गेल्या आठवड्याभरापासून बंद आहे. राजेश जोशी, पत्नी राधा, वडील सुरेश आणि काका शरद यांचे मोबाईल फोन ‘स्वीच आॅफ’ येत आहेत तर ‘लॅन्डलाईन’ फोनवर कोणीही उत्तर देत नाही. संपूर्ण जोशी कुटुंबिय फरार असून गेल्या आठवड्याभरापासून कोणीही त्यांना पाहिलेले नाही. संतप्त झालेल्या काही गुंतवणूदानांनी पोलिसांत तक्रार करण्यासोबतच जोशीच्या निवासस्थानी फलक लिहून ठेवला आहे. जोशी कुटुंबीयांनी गुंतवणूदारांशी लवकरात लवकर संपर्क करावा असे आवाहन यात करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजेश जोशी आई व मुलीच्या कर्करोगाच्या उपचारासाठी मुंबईला गेले होते. दीपक गेडाम नावाच्या सरकारी कंत्राटदाराने फसवणूक झाल्यानंतर राजेश जोशीच्या निवासस्थानाचा ताबाच घेतला आहे.
रविराज समूहाचा २०० कोटींचा गोलमाल
By admin | Updated: July 5, 2014 02:07 IST