शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विधी सेवा संमेलनाच्या उद्घाटनासाठी रविशंकर प्रसाद येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 21:33 IST

राज्य विधी सेवा प्राधिकरणांच्या १७ व्या अखिल भारतीय संमेलनाचे केंद्रीय विधी व न्याय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. हे दोन दिवशीय संमेलन १७ व १८ ऑगस्ट रोजी वर्धा रोडवरील हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे होणार आहे. या संमेलनात देशभरातील १०० वर न्यायाधीश सहभागी होतील.

ठळक मुद्देनागपूरला पहिल्यांदाच मानदेशभरातील १०० वर न्यायाधीश होणार सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य विधी सेवा प्राधिकरणांच्या १७ व्या अखिल भारतीय संमेलनाचे केंद्रीय विधी व न्याय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. हे दोन दिवशीय संमेलन १७ व १८ ऑगस्ट रोजी वर्धा रोडवरील हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे होणार आहे. या संमेलनात देशभरातील १०० वर न्यायाधीश सहभागी होतील.उद्घाटन कार्यक्रमाला १७ ऑगस्ट रोजी सकाळी १०.१५ वाजता सुरुवात होईल. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शरद बोबडे, न्यायमूर्ती एन. व्ही. रामना, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नांदराजोग, न्यायमूर्ती एस. सी. धर्माधिकारी व नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती रवी देशपांडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. त्यानंतर राज्य विधी सेवा प्राधिकरणे आणि उच्च न्यायालय विधी सेवा समित्यांचे अध्यक्ष व सचिवांच्या बैठकीला सुरुवात होईल. या बैठकीत न्यायव्यवस्था अधिक प्रभावी करणे, समाजातील गरजू व्यक्तींना नि:शुल्क व सक्षम विधी सेवा उपलब्ध करून देणे, कारागृहात विधी सेवा, गुन्हे पीडितांना भरपाई, पर्यायी वाद निवारण यंत्रणा इत्यादी मुद्यांवर चर्चा करून आवश्यक निर्णय घेतले जातील. १८ ऑगस्ट रोजी दुपारी १२.१५ वाजता समारोपीय कार्यक्रम होईल. या कार्यक्रमात सर्वोच्च न्यायालयाचे प्रधान न्यायमूर्ती रंजन गोगोई मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. हे संमेलन आयोजित करण्याचा मान नागपूरला पहिल्यांदाच मिळाला आहे.

 

टॅग्स :nagpurनागपूर