शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

रेशन दुकान होताहेत टार्गेट : संरक्षण न मिळाल्यास १ मेपासून धान्य वाटप बंद करण्याचा दिला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 22:59 IST

कोरोनाच्या बिकट परिस्थितीत गरीब जनतेला अल्प मानधनावर रेशन पुरविण्याचे काम रेशन दुकानदार स्वत:चा जीव धोक्यात घालून करीत आहेत.रेशन दुकानदारांना संरक्षण न दिल्यास १ मेपासून रेशन दुकान बंद ठेवण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

ठळक मुद्देधमकी शिवीगाळ यामुळे रेशन दुकानदार त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या बिकट परिस्थितीत गरीब जनतेला अल्प मानधनावर रेशन पुरविण्याचे काम रेशन दुकानदार स्वत:चा जीव धोक्यात घालून करीत आहेत. पण काही लोकांकडून रेशन दुकानदारांना टार्गेट केले जात आहे.  मिळत असलेल्या धमकी व शिवीगाळ यामुळे रेशन दुकानदार त्रस्त झाले आहेत. रेशन दुकानदारांना संरक्षण न दिल्यास १ मेपासून रेशन दुकान बंद ठेवण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.रेशन दुकानदारांना नगरसेवक, पक्षाचे कार्यकर्ते, गल्लीतील गुंड यांच्याकडूनही त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत. लोकांना धान्य वाटप करण्यासाठी दुकानदारांकडून धान्याचे पोते मागत असल्याचाही आरोप रेशन दुकानदारांचा आहे. त्यांना विरोध केल्यास खोट्या तक्रारी, नाहक बदनामी व ब्लॅकमेलिंगचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पारडी येथील एका रेशन दुकानदाराला नगरसेवकाने धमकी दिल्याची तक्रार त्याने जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. ओम गणेश को-ऑप. सोसायटीतर्फे संचालित रेशन दुकानदारानेसुद्धा शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार केली आहे. ओमनगर कोराडी येथील माया धान्य भंडारच्या संचालकाने तक्रार केली आहे. दीक्षा महिला बचत गटातर्फे संचालित रेशन दुकानातर्फेसुद्धा कार्डधारकाने जबरदस्ती केल्याची तक्रार केली आहे. सदर येथील प्रकाश किराणा भंडार या रेशन दुकानदाराने गर्दी करू नका असे म्हटल्यावर लोकांनी शिवीगाळ करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप लावल्याची तक्रार केली आहे. रेशन दुकानदारांच्या दररोज तक्रारी वाढल्या आहेत.दुकानांना संरक्षण प्रदान करावेआमच्या विरोधात होत असलेल्या अपप्रचारामुळे रेशन दुकानदारांचे मनोबल खचले आहे. पुरवठा विभाग सक्षम असूनसुद्धा त्यांच्याकडे तक्रार न करता विविध माध्यमातून रास्त भाव दुकानदारांना बदनाम करण्याचे काम सुरू आहे. धान्य वितरण करण्यात बाधा निर्माण होत असल्यामुळे, मानसिक तणावामुळे धान्य वितरण करणे रेशन दुकानदारांना शक्य होणार नाही. होत असलेल्या घटनेची शासनाने दखल घ्यावी, दुकानदारांना संरक्षण प्रदान करावे, अशी मागणी रास्त भाव दुकानदार, केरोसिन विक्रेता संघटनेने शासनाकडे केली आहे.

टॅग्स :foodअन्नagitationआंदोलन