शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ: ऊर्जावान संचलनातून झळकले राष्ट्रसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 00:46 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या उपराजधानीतील बाल व शिशु स्वयंसेवकांच्या शिस्तबद्ध व ऊर्जावान राष्ट्रसंस्कारांचा बुधवारी सायंकाळी नागपूरकरांना अनुभव मिळाला.

ठळक मुद्देबाल व शिशु स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव संपन्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिस्तबद्ध संचलन, प्रत्येक पावलात दिसून येणारी लयबद्धता, चेहऱ्यावरील आत्मविश्वास आणि प्रात्यक्षिकांमधून दिसून येणारी ऊर्जा, वय लहान असले तरी राष्ट्र व समाजाप्रति असणारी समर्पण भावना. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या उपराजधानीतील बाल व शिशु स्वयंसेवकांच्या शिस्तबद्ध व ऊर्जावान राष्ट्रसंस्कारांचा बुधवारी सायंकाळी नागपूरकरांना अनुभव मिळाला.

शहरात विविध ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नागपूर महानगराच्या बाल व शिशु स्वयंसेवकांच्या शस्त्रपूजन व विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. 
सर्वच ठिकाणांवर सायंकाळी बाल स्वयंसेवकांनी उपस्थितांसमोर निरनिराळी प्रात्यक्षिके सादर केली. यात लेझिम, योगासने, कवायती, दंडयोग, नियुद्ध यांचा प्रामुख्याने समावेश होता. कार्यक्रमाअगोदर बाल स्वयंसेवकांचे पथसंचलन झाले. यावेळी ठिकठिकाणच्या संघ शाखेचे स्वयंसेवक व नागरिक उपस्थित होते. शहरातील संघ पदाधिकारी व ज्येष्ठ स्वयंसेवकांनीदेखील यावेळी आवर्जून उपस्थित राहून या बालकांचा हुरूप वाढविला.नंदनवन भागसंघाच्या नंदनवन भागाच्या बाल शिशु स्वयंसेवकांचा विजयादशमी आणि शस्त्रपूजन उत्सव श्रीकृष्णनगरातील भारतीय विद्या भवनच्या मैदानावर आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गणेश मुक्कावार, विदर्भ प्रांताचे संघचालक राम हरकरे व वक्ता म्हणून संघाचे महानगर बौद्धिक प्रमुख रवींद्र सहस्रबुद्धे व भाग संघचालक अशोक बुजाने उपस्थित होते. याशिवाय सरसंघचालक डॉ.मोहन भागवत हेदेखील बाल स्वयंसेवकांचा हुरुप वाढविण्यासाठी उपस्थित होते. ज्या संघटनेचा प्राण हा अनुशासन, राष्ट्रहित,सुसंस्कार असतो, त्या संघटनेला अंत नसतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याच उद्देशाने कार्य करतो आहे. बालमनावर सुसंस्कार, अनुशासन आणि राष्ट्रहिताचे बीज पेरतो आहे, असे प्रतिपादन सहस्रबुद्धे यांनी केले. अनुशासन, सुसंस्कार यामुळे संघ चांगला नागरिक घडविण्याचे काम करतो आहे. मातृभूमीची सेवा, जीवसेवेसाठी स्वयंसेवकांची धडपड दिसून येते. संस्काराचे बीज रोवणाºया या संघटनेत एक चांगला नागरिक घडत असल्याची भावना मुक्कावार यांनी व्यक्त केली.बिनाकी, सदर, गिट्टीखदान भागबिनाकी, सदर, गिट्टीखदान भागातील बाल शिशु स्वयंसेवकांचा विजयादशमी आणि शस्त्रपूजन उत्सव टेका नाका येथील पोलीस ग्राऊंड येथे झाला. बालरोगतज्ज्ञ डॉ.हिमांशू दुआ हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. संघ स्वयंसेवक कितीही मोठा झाला तरी तो आपला परिचय स्वयंसेवक म्हणूनच देतो. येथे सर्वधर्मसमभावाचे संस्कार देण्यात येतात व लहान मुलांतून एक चांगला नागरिक बनतो असे त्यांनी म्हटले.अजनी-अयोध्या भागअजनी, अयोध्या भागातील बाल-शिशु स्वयंसेवकांचा विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सव तारांगण मैदान,न्यू सुभेदार ले-आउट येथे संपन्न झाला. सनदी लेखापाल सुचित उस्केलवार कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. महानगर सहकार्यवाह उदयराव वानखेडे, अजनी भाग संघचालक डाँ. रमाकांत कापरे, अयोध्या भाग संघचालक मनोहरराव सपकाळ मंचावर उपस्थित होते. सर्वच संस्कार संघातून मिळतात व आज संघातून देशभक्त तयार होत आहेत. आचार-विचारातून संघ सगळ्या स्वयंसेवकांना घडवतो आहे, असे उस्केलवार म्हणाले. कार्यक्रमाला प्रामुख्याने महानगर अधिकारी सुभाषचंद्र देशकर, नेताजी चिंचोलकर, मुन्नाजी रहांगडाले, प्रकाश बापट, प्रसाद वरदळकर प्रामुख्याने उपस्थित होते.इतवारी व लालगंज भागमोहिते व इतवारी भागाच्या बाल स्वयंसेवकांच्या विजयादशमी उत्सवाचे आयोजन गणेशपेठ येथील गाडीखाना मैदानावर करण्यात आले. यावेळी ‘आयएमए’चे अध्यक्ष डॉ. कुश झुनझुनवाला हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मेहनत आणि चिकाटी असेल तर काही पण साध्य करणे सोपे जाते. शारीरिक वाढीसाठी शाखेतील मैदानी खेळ मदतीचे ठरतात. मुलांनी मोठ्या व्यक्तींपासून प्रेरणा घ्यावी, असे प्रतिपादन डॉ. झुनझुनवाला यांनी केले.धरमपेठ, त्रिमूर्तीनगर, सोमलवाडा भागधरमपेठ, त्रिमूर्तीनगर व सोमलवाडा भागातील बाल व शिशु स्वयंसेवकांचा उत्सव प्रतापनगर येथील नवनिर्माण कॉलनीच्या मैदानात पार पडला. डॉ. अभय दातारकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व संघसंस्कारांच्या प्रेरणेतून आयुष्य कसे घडते, यावर भाष्य केले.मोहिते भागमोहिते भागातील बाल व शिशु स्वयंसेवकांचा उत्सव ईस्टर्न स्पोर्टस् क्लबजवळील एनआयटी मैदानात आयोजित करण्यात आला. धर्मपाल अग्रवाल हे प्रमुख अतिथी होते. त्यांनी संघाचे कार्य आणि सामाजिक जीवनातील संस्कार यांच्यावर प्रकाश टाकला. तसेच नवीन पिढीने आदर्श जीवन कसे जगावे, याबाबत मार्गदर्शन केले.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघnagpurनागपूर