शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील प्राचार्य ‘नापास’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 23:26 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील शैक्षणिक दर्जा वाढविण्याचे विविध पातळींवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र नागपूर विद्यापीठातील प्राचार्यांची गुणवत्तादेखील तपासण्याची वेळ आली आहे. विद्यापीठात यंदा एकाही प्राचार्याला उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार मिळू शकला नाही. दुर्दैवाची बाब म्हणजे साडेचारशे महाविद्यालयातून या पुरस्कारासाठी अवघा एक अर्ज आला व गुणवत्तेच्या मापदंडात बसत नसल्याने संबंधित प्राचार्यांना अपात्र ठरविण्यात आले. जर प्राचार्यांची ही स्थिती असेल तर मग शिक्षक व विद्यार्थ्यांकडून काय अपेक्षा करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देएकालाही उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार नाही : साडेचारशे महाविद्यालयातून आला अवघा एक अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील शैक्षणिक दर्जा वाढविण्याचे विविध पातळींवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र नागपूर विद्यापीठातील प्राचार्यांची गुणवत्तादेखील तपासण्याची वेळ आली आहे. विद्यापीठात यंदा एकाही प्राचार्याला उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार मिळू शकला नाही. दुर्दैवाची बाब म्हणजे साडेचारशे महाविद्यालयातून या पुरस्कारासाठी अवघा एक अर्ज आला व गुणवत्तेच्या मापदंडात बसत नसल्याने संबंधित प्राचार्यांना अपात्र ठरविण्यात आले. जर प्राचार्यांची ही स्थिती असेल तर मग शिक्षक व विद्यार्थ्यांकडून काय अपेक्षा करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.नागपूर विद्यापीठात दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारांचे वितरण होते. या पुरस्कारांत उत्कृष्ट प्राचार्य हादेखील पुरस्कार असतो. यासाठी प्राचार्यांकडून अर्ज मागविण्यात येतात. मागील वर्षीपर्यंत या पुरस्कारासाठी दहा किंवा त्याहून अधिक अर्ज यायचे. यंदा अर्ज मागवितानाच विद्यापीठाने पात्रतेचे निकष स्पष्ट केले होते. या निकषांच्या आधारावर देण्यात येणाऱ्या गुणांमध्ये ४५ टक्के गुण मिळविणे अनिवार्य होते.उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कारासाठी अवघा एकच अर्ज आला. निकषांच्या पातळीवर मूल्यमापन केले असता संबंधित एका प्राचार्याला ४५ टक्क्यांचा टप्पा गाठता आला नाही. त्यामुळे एकालाही पुरस्कार घोषित न करण्याचा विद्यापीठ प्रशासनाने निर्णय घेतला.गुणवत्ता वाढीसाठी निकष ठरविलेयासंदर्भात कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांना विचारणा केली असता त्यांनीदेखील प्राचार्यांच्या गटातून अवघा एकच अर्ज आल्याबाबत आश्चर्य व्यक्त केले. दर वर्षी एक अर्ज आला असेल तर संबंधित व्यक्तीला पुरस्कार मिळत होता. मात्र यंदा आम्ही नियम कठोर केले व मापदंड निश्चित केले. एका दृष्टीने ही प्राचार्यांची परीक्षाच होती. यात त्यांना यश मिळविता आले नाही. पुरस्कारांचा दर्जा वाढावा व त्यानिमित्ताने गुणवत्ता वाढीसाठी महाविद्यालयांमध्ये प्रयत्न व्हावेत, हा यामागचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.शिक्षकांचे सामाजिक कार्य घटले का ?विद्यापीठातर्फे सामाजिक कार्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना ‘सामाजिक कार्य उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्कार देण्यात येतो. यासाठीदेखील अर्ज मागविण्यात आले होते. या गटातदेखील अवघा एकच अर्ज आला. आश्चर्याची बाब म्हणजे विद्यापीठात मोठ्या प्रमाणावर विज्ञान व अभियांत्रिकी महाविद्यालये असतानादेखील उत्कृष्ट संशोधक पुरस्कारासाठी केवळ ११ अर्ज आले.अर्जांची स्थितीपुरस्कार                  आलेले अर्ज                निवडउत्कृष्ट प्राचार्य                 १                               -उत्कृष्ट शिक्षक               २०                             २उत्कृष्ट संशोधक            ११                             १उत्कृष्ट लेखक                ३                              १उत्कृष्ट सामाजिक कार्य  १                              -

 

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठnagpurनागपूर