शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

वेगाने घेतला दोघांचा बळी

By admin | Updated: July 15, 2017 02:29 IST

वेगाशी स्पर्धा करीत रस्त्याने धावणारी कार विजेच्या खांबाला धडकून बाजूच्या झाडावर आदळली. त्यामुळे

अनियंत्रित कार झाडावर आदळली मेट्रो रेल्वेच्या कार्यालयाजवळ अपघात एकाची प्रकृती चिंताजनक लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वेगाशी स्पर्धा करीत रस्त्याने धावणारी कार विजेच्या खांबाला धडकून बाजूच्या झाडावर आदळली. त्यामुळे झालेल्या भीषण अपघातात कारमधील दोन तरुण ठार झाले तर, एकाची प्रकृती चिंताजनक आहे. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेट्रो रेल्वे कार्यालयाजवळ गुरुवारी मध्यरात्री हा भीषण अपघात घडला. अक्षय मल्हारी मस्के (वय २०) असे जखमीचे नाव असून, अभिजित ऊर्फ जोजो कच्चू पायलू (वय १८) आणि प्रणव महेश नायडू (वय १९) अशी मृतांची नावे आहेत. हे तिघेही जिवलग मित्र होते. नेहमीप्रमाणे गुरुवारी रात्री ११.४० च्या सुमारास ते अंबाझरी, सिव्हिल लाईन भागात कारने (एमएच २०/ बीझेड ४७४७) फिरत होते. कार अक्षय मस्के चालवित होता. सिव्हिल लाईन्सकडे जात असताना कार चालविताना त्यांच्यात गंमतजंमत सुरू होती. कारचा वेग खूपच जास्त होता. मेट्रो रेल्वे कार्यालयाजवळचा भाग चढ-उताराचा असून तेथे धोकादायक पद्धतीचे वळणही आहे. कारचा वेग मर्यादेपेक्षा जास्त असल्यामुळे अपघातस्थळी कार अनियंत्रित झाली आणि रस्त्याच्या बाजूला असलेल्या विजेच्या खांबाला धडक देऊन ती समोरच्या झाडावर आदळली. त्यामुळे कारच्या समोरच्या भागाची पुरती मोडतोड झाली. धडक जोरदार असल्यामुळे त्याचा मोठा आवाज झाला. बाजूलाच सदर पोलीस ठाणे असल्यामुळे बाजूची मंडळी धावून आली. त्या मार्गाने जाणाऱ्यांनी लगेच अपघाताची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहचले. वायरलेसवरून माहिती कळताच नाईट राऊंडवर असलेले पोलीस उपायुक्त रवींद्रसिंग परदेशी हेसुद्धा घटनास्थळी दाखल झाले. कारच्या समोरचा भाग पुरता मोडल्याने आतमधील अक्षय, अभिजित तसेच प्रणव तिघेही त्यात फसले. नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी त्यांना बाहेर काढले. तिघांचीही प्रकृती चिंताजनक होती. त्यांना रुणालयात नेले असता डॉक्टरांनी अभिजित आणि प्रणवला मृत घोषित केले. दरम्यान, त्यांच्या मोबाईलवर फोन आल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांना या अपघाताची माहिती दिली. अक्षय मस्के याच्यावर खासगी इस्पितळात उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर आहे. विशेष म्हणजे, या अपघातात तिघांचाही मृत्यू झाल्याची चर्चा सर्वत्र पसरली होती. सदर पोलीस ठाण्यात मंडळीदेखिल या वृत्ताला दुजोरा देत होते. रात्री या संबंधाने बोलताना सदरचे ठाणेदार सुनील बोंडे यांनी अक्षयची प्रकृती गंभीर असल्याचे स्पष्ट केले. दोघांचे बळी घेणाऱ्या या अपघाताला कारचालकाचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचे पुढे आले आहे. कारचा वेग ताशी १०० किलोमीटरपेक्षाही जास्त असावा. कारण अपघात झाल्यानंतर वेगाचे संकेत देणाऱ्या कारमधील मीटरचा काटा १०० वर अडकून पडला होता. अक्षय मस्के कार चालवित होता. त्यामुळे सदर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याचे वडील प्राध्यापक असून त्याच्या परिवारात बारावी पास झालेली बहीण तसेच आईवडील आहेत. तो अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी शनिवारी पुण्याला जाण्याच्या तयारीत होता. विशेष म्हणजे, अपघातात ठार झालेल्यांपैकी प्रणव हा कळमेश्वरच्या एका कंपनीत अ‍ॅप्रेंटिसशिप करीत होता. त्याचे वडील तेथेच मोठ्या पदावर कार्यरत असून आई गायत्री शिक्षिका आहेत. तो नियमित कंपनीत कामाला जात नव्हता. त्यामुळे त्याचे आईवडील त्याला नेहमीच टोकत होते. गुरुवारी रात्रीही त्याला घराबाहेर पडण्यासाठी आईने विरोध केला होता. मात्र, लगेच येतो, असे म्हणून तो घरून निघून गेला. अभिजितचे वडील दुबई येथे नोकरी करतात. तो बारावी शिकलेला होता. त्याला एक १० वर्षीय आर्यन नामक भाऊ आणि आई मीना आहेत. विशेष म्हणजे, प्रा. मल्हारी मस्के हे गेल्या वर्षी राज्यभर चर्चेत आले होते. कुख्यात गुंड सुमित ठाकूर याच्या टोळीतील गुंडांनी मस्केच्या घराला आणि कारला आग लावण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना धमक्याही दिल्या होत्या. त्यामुळे ते नागपूर सोडून पुण्याला गेले, अशी चर्चा होती. तेव्हा हे प्रकरण राज्यभर गाजले होते.