शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना निदानासाठी रॅपिड अ‍ॅन्टी बॉडी ब्लड टेस्ट करा : सर्वोच्च न्यायालयात याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 21:28 IST

कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता या आजाराचे तातडीने निदान होणे गरजेचे आहे. करिता, देशातील सर्व राज्यांमधील कोरोना संशयित रुग्णांची रॅपिड अ‍ॅन्टी बॉडी ब्लड टेस्ट करण्याचे निर्देश केंद्र सरकारला देण्यात यावेत, अशा विनंतीसह सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

ठळक मुद्देवेळ व खर्च कमी लागत असल्याचा दावा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता या आजाराचे तातडीने निदान होणे गरजेचे आहे. करिता, देशातील सर्व राज्यांमधील कोरोना संशयित रुग्णांची रॅपिड अ‍ॅन्टी बॉडी ब्लड टेस्ट करण्याचे निर्देश केंद्र सरकारला देण्यात यावेत, अशा विनंतीसह सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चद्वारे मान्यताप्राप्त या टेस्टला वेळ व खर्च कमी लागत असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.डॉ. राजेश स्वर्णकार असे याचिकाकर्त्याचे नाव असून ते चेस्ट फिजिशियन आहेत. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चद्वारे कोरोना नियंत्रणाकरिता ४ एप्रिल रोजी जारी मार्गदर्शक तत्त्वांमध्ये रॅपिड अ‍ॅन्टी बॉडी ब्लड टेस्टचा समावेश आहे. आरोग्य मंत्रालयातील तज्ज्ञांशी सखोल चर्चा केल्यानंतर ही मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली आहेत. सध्या पीसीआर टेस्टद्वारे कोरोनाचे निदान केले जात आहे. ही प्रक्रिया खूप किचकट आहे. केवळ तज्ज्ञ व्यक्ती ही टेस्ट करू शकते. ही टेस्ट करताना सुरक्षेची काळजी घ्यावी लागते. या टेस्टची सुविधा देशात मोजक्याच ठिकाणी उपलब्ध आहे. या टेस्टच्या तुलनेत रॅपिड अ‍ॅन्टी बॉडी ब्लड टेस्ट सोपी आहे. ही टेस्ट करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्ती, महागडी उपकरणे, पीपीई कीट इत्यादीची गरज नाही. ही टेस्ट कमी वेळेत व खर्चात करता येते. कोरोनासारखी लक्षणे असलेले अन्य विविध आजार आहेत. केवळ आवश्यक टेस्ट करूनच त्या आजारांचे निदान करता येते. त्यामुळे कोरोना निदानासाठी पीसीआर टेस्ट केंद्रांवरील ताण वाढला आहे. परिणामी, खासगी प्रयोगशाळांना कोरोना निदानाची परवानगी दिली जात आहे. कोरोना निदान अधिक प्रभावीपणे व तातडीने होण्यासाठी सरकारने रॅपिड अ‍ॅन्टी बॉडी ब्लड टेस्टचीही अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. कौन्सिलने रॅपिड अ‍ॅन्टी बॉडी ब्लड टेस्टकरिता आठ किटस्ना मान्यता दिली आहे असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. तुषार मंडलेकर व अ‍ॅड. ऋषी जैन कामकाज पाहतील.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSupreme Courtसर्वोच्च न्यायालय