शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात शाळेच्या इमारतीत चिमुकलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 23:59 IST

समवयीन मुलांसोबत खेळत असलेल्या एका साडेतीन वर्षांच्या चिमुकलीला उचलून नेऊन एका नराधमाने शाळेच्या आवारात तिच्यावर अत्याचार केला. रविवारी भरदुपारी वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही संतापजनक घटना घडली. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे. अत्याचार करणारा नराधम भूषण दहाट (वय २५) फरार असून, त्याच्या मुसक्या बांधण्यात पोलिसांना वृत्त लिहिस्तोवर यश आले नव्हते.

ठळक मुद्देसुरक्षा रक्षक बनला भक्षक : वाडीतील घटनेने प्रचंड संताप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : समवयीन मुलांसोबत खेळत असलेल्या एका साडेतीन वर्षांच्या चिमुकलीला उचलून नेऊन एका नराधमाने शाळेच्या आवारात तिच्यावर अत्याचार केला. रविवारी भरदुपारी वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही संतापजनक घटना घडली. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे. अत्याचार करणारा नराधम भूषण दहाट (वय २५) फरार असून, त्याच्या मुसक्या बांधण्यात पोलिसांना वृत्त लिहिस्तोवर यश आले नव्हते.चिमुकली फुटाळा वस्तीतील रहिवासी आहे. तिच्या कुटुंबीयांची आर्थिक अवस्था अत्यंत कमकुवत आहे. वडील मोलमजुरी करतात तर आई धुणीभांड्याचे काम करते. घरात सांभाळणारे कुणी नसल्याने तिची आई तिला कधी कधी सोबत कामाच्या ठिकाणी नेते. रविवारी दुपारी आईने चिमुकलीला अमरावती मार्गावरील कॅम्पस जवळच्या काचीमेट परिसरातील एका इमारतीत नेले. तेथील काही ठिकाणी आई धुणीभांड्याच्या कामाला गेली तर चिमुकली स्कूल ऑफ स्कॉलरच्या परिसरात समवयीन मुलांसोबत खेळू लागली. नराधम भूषण दहाटची बहीण शाळेत चपराशी असून, त्याचे वडील बाजूच्या अपार्टमेंटमध्ये चौकीदारी करतात. हा नराधमही सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतो. रविवारी दुपारी २.३० च्या सुमारास तो खेळत असलेल्या मुलांजवळ आला. त्याने इतरांना हुसकावून लावले आणि चिमुकलीला उचलून शाळेच्या आवारात नेले. तेथे तिच्यावर त्याने अत्याचार केला. त्यानंतर मुलीला सोडून दिले. काही वेळेनंतर मुलीची आई काम संपवून तिच्याजवळ आली. दोघी मायलेकी घरी परतल्या. सायंकाळी चिमुकली वेदनांनी ओरडू लागली. त्यामुळे आईने तिला जवळ घेऊन तिची पाहणी तसेच विचारणा केली. त्यानंतर हा संतापजनक प्रकार समोर आला. नेहमीच तेथे जात असल्यामुळे आणि नराधम दहाट त्याच भागात राहत असल्यामुळे मुलगी त्याला ओळखत होती. तिने आईला झालेला प्रकार आणि आरोपीचे नावही सांगितले. मुलीच्या आईने लगेच आरोपीच्या बहिणीला फोन करून या कुकृत्याची माहिती कळविली. त्यानंतर आजूबाजूच्यांना घडलेला प्रकार सांगितला. सोमवारी सकाळी अपार्टमेंटमधील महिलांना मुलीवरील अत्याचाराची व्यथा सांगितली. महिलांनी पीडित मुलीच्या आईला धीर देत पोलिसांकडे तक्रार नोंदविण्याचा सल्ला दिला. बाजूचे सामाजिक कार्यकर्तेही सोबत आले.पोलिसांची पाच तास चौकशी , सात तासानंतर मेडिकलदुपारी १ च्या सुमारास पीडित मुलीला घेऊन तिची आई आणि काही सामाजिक कार्यकर्ते वाडी पोलीस ठाण्यात पोहचले. वाडी पोलिसांनी चिमुकली आणि तिच्या आईला तब्बल पाच तास ठाण्यात बसवून चौकशी केली. त्यानंतर साडेसहा ते सातच्या दरम्यान मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी मेयोत पाठविण्यात आले. रात्री ९.३० पर्यंत मुलगी तेथे होती. तिकडे भरपूर वेळ मिळाल्याने नराधम दहाट तेथून पळून गेला. रात्री १० पर्यंत त्याला अटक करण्यात वाडी पोलिसांना यश आले नव्हते.परिसरात प्रचंड संतापया घटनेमुळे काचीमेट, वाडी आणि फुटाळा परिसरात प्रचंड संताप निर्माण झाला आहे. नराधम दहाटच्या मुसक्या बांधण्यात पोलिसांनी तत्परता दाखविली नाही तर या भागातील नागरिकांचा रोष उफाळून येऊ शकतो. यासंबंधाने वाडी पोलिसांकडे चौकशी केली असता आरोपींचा शोध घेतला जात असल्याचे पोलीस म्हणाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार