शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

By admin | Updated: June 12, 2014 01:04 IST

नोकरी आणि लग्नाचे आमिष दाखवून शिक्षणाधिकारी पांडुरंग लक्ष्मण सुरजुसे याने एका विधी पदवीधर तरुणीवर बलात्कार केल्याचा प्रकार उजेडात आला आहे.

नागपूर : नोकरी आणि लग्नाचे आमिष दाखवून शिक्षणाधिकारी पांडुरंग लक्ष्मण सुरजुसे याने एका विधी पदवीधर तरुणीवर बलात्कार केल्याचा प्रकार उजेडात आला आहे. पीडित तरुणीने तब्बल एक वर्षानंतर नोंदवलेल्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी ५४ वर्षीय सुरजुसेविरुद्ध भादंविच्या ३७६, ४१६ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रकरण असे की, पीडित तरुणी ही एम. ए. आणि एलएल. बीपर्यंत शिकलेली आहे. ती या घटनेपूर्वी शिक्षिकेच्या नोकरीच्या शोधात असताना तिची एका सामाजिक कार्यकर्त्या महिलेसोबत ओळख झाली होती. तिने उपशिक्षणाधिकारी सुरजुसे याच्यासोबत आपली ओळख असल्याचे आणि तुला ते शिक्षिकेची नोकरी लावून देऊ शकतात, असे सांगितले होते. मे २०१३ मध्ये तिने या तरुणीची सुरजुसे याच्यासोबत ओळख करून दिली होती. सुरजुसे हा प्रौढ शिक्षण विभागात शिक्षणाधिकारी असताना त्याने या तरुणीला अनुदानित शिक्षण संस्थेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले होते. त्याने तिला ओळख म्हणून तीन-चार शिक्षण संस्थांमध्येही नेले होते. तेथील प्रमुखांसोबत नोकरी संदर्भात बातचित केली होती. त्यामुळे ती सुरजुसे याच्यावर प्रभावित झाली होती. एक दिवस चक्क त्याने या तरुणीला लग्नाचे आमिष दाखविले. तिला अमरावती मार्गावरील म्हाडा कॉलनी समृद्धी संकुलातील एक फ्लॅटमध्ये नेले. या ठिकाणी त्याने या तरुणीवर बलात्कार केला. ११ मे ते २५ मे २०१३ या काळात त्याने वारंवार पीडित तरुणीवर बलात्कार केला. तब्बल वर्ष लोटूनही नोकरी मिळाली नाही. शिवाय सुरजुसे याने लग्नही केले नाही. त्यामुळे तिने सीताबर्डी पोलीस ठाणे गाठून आपली कर्मकहाणी सांगितली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सुरजुसे हा आपल्या कुटुंबासह पुणे येथे गेल्याचे पोलिसांची माहिती आहे. काही वर्षांपूर्वी त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना आपल्या सापळ्यात अडकवले होते. (प्रतिनिधी)