नागपूर : गुन्हेगारांचा अड्डा बनलेल्या रेल्वे स्थानकाच्या वेटिंग रूम आणि बोगीमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. पीडित तरुणी घरी परतल्यावर या घटनेची माहिती उघड झाली. आरोपी हा तब्बल पाच दिवस रेल्वे स्थानकावर होता. त्यामुळे रेल्वे पोलिसांच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. २३ वर्षीय पीडित तरुणी लकडगंज पोलीस ठाणे हद्दीत राहते. ती ५ रोजी घरातून निघून गेली. घरच्यांनी ती बेपत्ता झाल्याची पोलिसात तक्रारही दिली. मंगळवारी ती तरुणी घरी परत आली. साहिल सुरेश वामन (२५) रा. खरबी वस्ती नंदनवन असे आरोपीचे नाव आहे. आरोपी पीडित तरुणीचा नातेवाईक आहे. त्याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून ५ मे रोजी तिच्याशी लग्न करण्याच्या बहाण्याने तिला आपल्यासोबत नेले. तो तरुणीला मामाच्या घरी बिलासपूरला घेऊन गेला. एक दिवस थांबल्यावर तो ७ मे रोजी परत नागपूरला आला. पीडित तरुणीनुसार ७ मे रोजी रात्री ८ वाजता रेल्वे स्टेशनच्या आऊटरवर उभ्या असलेल्या रेल्वेच्या बोगीमध्ये आरोपी साहिलने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ९ मे रोजी त्याने पुन्हा रेल्वे स्थानकाच्या वेटिंग रूममध्ये तिच्यावर अत्याचार केला. १० मे व ११ मे रोजी स्टेशनवर थांबल्यानंतर साहिलने लग्न करण्यास नकार दिला आणि तरुणीला घरी परत जाण्याचा सल्ला देऊन तो फरार झाला. मंगळवारी घरी परतल्यावर पीडित तरुणीने कुटुंबीयांना आपबिती सांगितली. यानंतर तरुणीच्या नातलगांनी लकडगंज पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)रेल्वे पोलिसांच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह रेल्वे स्टेशन हा गुन्हेगारांचा अड्डा बनला आहे. येथे नेहमीच लुटपाटीच्या घटना होत असतात. गुन्हेगारांना पोलिसांचे आश्रय असल्याने प्रकरणाची नोंद होत नाही. गेल्या ९ मे रोजी बुटीबोरी येथील मजुरी करणाऱ्या एका तरुणाला जखमी करून त्याच्यजवळसे १० हजार रुपये लुटण्यात आले होते. जीआरपी पोलिसांनी तक्रार नोंदविण्याऐवजी त्याला परत पाठविले होते.शनिवारी रायपूर येथील चार तरुणांचे १ लाख रुपये हिसकावण्यात आले होते. परंतु ती मुले रायपूरला निघून गेल्याने प्रकरण उघडकीस आले नाही. काही दिवसांपूर्वीच गुन्हे शाखेने रेल्वे बोगीतून १०० किलो गांजा जप्त केला होता. या घटनेमध्ये आरोपी साहील हा ७ ते १२ मे पर्यंत तरुणीसोबत रेल्वे स्थानक परिसरात होता. या दरम्यान गस्तीवर असलेल्या पोलिसांची त्यांच्यावर नजर न जाणे आश्चर्यकारक आहे. त्यामुळे एकूणच रेल्वे पोलिसांच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रेल्वे स्थानकाच्या वेटिंग रूममध्ये बलात्कार
By admin | Updated: May 14, 2015 02:32 IST