शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कार पीडितेला करायचाय गर्भपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 20:57 IST

मालकाने वारंवार बलात्कार केल्यामुळे घर कामगार महिला गर्भवती राहिली आहे. आधीच दोन मुलांची आई असलेल्या त्या महिलेने गर्भपाताची परवानगी मिळविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. तिच्या पोटात वाढत असलेला गर्भ २९ आठवड्यांचा झाला आहे. न्यायालयाने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता केंद्र व राज्य सरकारला यावर २७ मार्चपर्यंत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला आहे.

ठळक मुद्देहायकोर्टात याचिका : घर मालकाच्या कूकर्माची बळी

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मालकाने वारंवार बलात्कार केल्यामुळे घर कामगार महिला गर्भवती राहिली आहे. आधीच दोन मुलांची आई असलेल्या त्या महिलेने गर्भपाताची परवानगी मिळविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. तिच्या पोटात वाढत असलेला गर्भ २९ आठवड्यांचा झाला आहे. न्यायालयाने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता केंद्र व राज्य सरकारला यावर २७ मार्चपर्यंत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला आहे.आरोपीदेखील दोन अपत्यांचा बाप आहे. पीडित महिला त्याच्या घरात सकाळी ६ ते १० या वेळात ३५० रुपये हप्त्याप्रमाणे काम करीत होती. गेल्यावर्षी दसऱ्यापूर्वी आरोपीने महिलेला कार्यालयाची साफसफाई करण्यास सांगितले. दरम्यान, त्याने महिलेच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन तिच्यावर बलात्कार केला. महिलेने आरोपीच्या पत्नीकडे त्याच्या वाईट वागणुकीची तक्रार करून काम सोडून दिले. दोन दिवसांनंतर आरोपीचा मुलगा व सून महिलेला समजावण्यासाठी गेले व त्यांनी महिलेला कामावर परत येण्यास राजी केले. त्यानंतर आरोपीने पुन्हा महिलेवर बलात्कार केला व त्याची वाच्चता कुठे केल्यास वाईट परिणाम होतील अशी धमकी दिली. परिणामी, महिलेने आरोपीच्या घरचे काम सोडून दिले. दोन महिन्यांनंतर महिलेने धाडस करून आरोपीच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. परंतु, त्यांनी महिलेच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला नाही व तिला जबर मारहाण केली. दुसरीकडे आरोपीने महिलेला गर्भपात करण्यासाठी पाच हजार रुपये दिले. दरम्यान, सामान्य मार्गाने गर्भपात करणे शक्य न झाल्यामुळे महिलेने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.----------------चार ठिकाणी दिल्या तक्रारीपीडित महिलेने यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस अधीक्षक, सहायक पोलीस अधीक्षक व खामगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तिला न्यायाची प्रतीक्षा आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयRapeबलात्कार