शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 01:16 IST

जरीपटकात अल्पवयीन विद्यार्थिनीवर शेजाऱ्याने अत्याचार करून तिला गर्भवती केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

ठळक मुद्देआरोपीस अटक : जरीपटका येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जरीपटकात अल्पवयीन विद्यार्थिनीवर शेजाऱ्याने अत्याचार करून तिला गर्भवती केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.मनीष नीळकंठ गेडाम (४५) रा. जागृतनगर, सुगतनगर असे आरोपीचे नाव आहे. पीडित विद्यार्थिनी १६ वर्षांची असून तिने बारावीची परीक्षा दिली आहे. तिच्या आईवडिलांचे कुरिअरचे काम आहे. मनीष विद्यार्थिनीच्या आईवडिलांकडे काम करतो. तो त्यांच्या शेजारीच राहतो. कामाच्या माध्यमातून त्याचे विद्यार्थिनीच्या घरी येणे-जाणे होते. दरम्यान त्याची नजर या विद्यार्थिनीवर पडली. १६ जानेवारीला तो तिच्या घरी आला. त्यावेळी ती एकटीच होती. तिने दिलेल्या बयानानुसार मनीषने तिला पोहे खाण्यासाठी दिले. त्यानंतर ती विद्यार्थिनी बेशुद्ध झाली. त्यानंतर मनीषने तिच्यावर अत्याचार केला. या घटनेनंतर या विद्यार्थिनीचे शोषण सुरूझाले. मनीषला संधी मिळताच तो तिच्या घरी येऊन तिच्यावर अत्याचार करू लागला. विरोध केल्यानंतर तो या विद्यार्थिनीला धमकावत होता. दरम्यान ती गर्भवती राहिली. सुरुवातीला तिला काहीच समजले नाही. ती मनीषच्या यातना सहन करीत होती. काही दिवसांपासून मनीष तिचे सातत्याने शोषण करीत होता. गर्भवती झाल्यामुळे तिला मनीषचा अत्याचार सहन होत नव्हता. तिच्या वागणुकीवरून कुटुंबीयांनाही शंका आली. तिने घटनेची माहिती दिल्यानंतर कुटुंबीयांनी तिला डॉक्टरांकडे नेले. तेथे ती गर्भवती असल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी याबाबत जरीपटका पोलिसात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून मनीषला अटक केली आहे. मनीष विवाहित असून त्याच्या या कृत्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

टॅग्स :Rapeबलात्कारStudentविद्यार्थी