लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घरी आलेल्या पाहुण्याने १७ वर्षीय मुलीला घरातून ओढत कपाशीच्या शेतात नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तो पळून गेला. ही घटना कळमेश्वर भागात गुरुवारी सायंकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास घडली.राजेश भलावी (३५, रा. मोहगाव हवेली, ता. सौंसर, जिल्हा छिंदवाडा, मध्य प्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. पीडित मुलगी ही तिच्या आईच्या मृत्यूनंतर लहान भावासोबत नरखेड भागात आजीकडे राहते. तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केल्यानंतर ते एका गावात सालगडी म्हणून काम करतात आणि तिथे राहतात. तिला व भावाला नवीन कपडे खरेदी करण्यासाठी ती चार दिवसांपासून वडिलांकडेच होती.राजेश गुरुवारी तिच्याकडे पाहुणा म्हणून आला होता. तो मेंढेपठार (ता. काटोल) शिवारातील पोल्ट्री फार्मवर नोकर म्हणून काम करतो. सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास गावाला जात असल्याचे सांगून तो मोटरसायकलने निघून गेला. त्याने मोटरसायकल शेतात लपवून ठेवली. आई वडील शेताबाहेर गेल्याचे पाहताच त्याने घरात प्रवेश केला व तिला ओढत कपाशीच्या शेतात नेले. तिच्यावर अत्याचार केल्यानंतर त्याने मोटरसायकलने तिथून लगेच पळ काढला.तिने रात्री हा संपूर्ण प्रकार वडिलांना सांगितला. त्यांनी लगेच सावनेर पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदविली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. दुसरीकडे, आरोपीला तत्काळ अटक करून त्याला कठोर शिक्षा करावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य मनोहर कुंभारे यांच्यासह नागरिकांनी केली आहे.
नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर भागात अल्पवयीन मुलीवर बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 23:37 IST
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : घरी आलेल्या पाहुण्याने १७ वर्षीय मुलीला घरातून ओढत कपाशीच्या शेतात नेले आणि तिच्यावर अत्याचार ...
नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर भागात अल्पवयीन मुलीवर बलात्कार
ठळक मुद्देआरोपी फरार