शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

नागपुरात  सावत्र पित्याने केला अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 00:14 IST

आपल्या सावत्र मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाला यशोधरानगर पोलिसांनी अखेर अटक केली.

ठळक मुद्देशाळकरी मुलीचे अपहरण : एक आठवड्यानंतर सापडला आरोपी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपल्या सावत्र मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाला यशोधरानगर पोलिसांनी अखेर अटक केली. प्रणय ऊर्फ पिंटू टेंभूर्णे ऊर्फ साहिल खान (वय ३८) असे आरोपीचे नाव आहे.पीडित बालिका (वय १२) सहावीत शिकते. वडिलाचे छत्र हरविल्यामुळे तिच्या आईने आधार म्हणून आरोपी प्रणयसोबत दुसरा निकाह केला होता. तो दारुडा आणि ऐतखाऊ असल्याचे नंतर तिच्या लक्षात आले. दरम्यान, आरोपीची नजर बालिकेवर होती. त्याने गेल्या आठवड्यात आपल्या मित्राची मोटरसायकल आणून बालिकेला त्यावर बसविले आणि तिला घेऊन तो बेपत्ता झाला. रात्र झाली तरी आरोपी आणि मुलगी घरी न परतल्याने पीडित बालिकेच्या आईने आपल्या बहिणीच्या मदतीने शोधाशोध सुरू केली. यशोधरानगर ठाण्यात तक्रारही नोंदवली. पोलिसांनी बालिकेच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला आणि तिच्यासोबत आरोपीचीही शोधाशोध सुरू केली. आठ दिवस होऊनही आरोपी किंवा त्याने अपहरण केलेल्या बालिकेचा पत्ता लागत नसल्याने पोलीसही हादरले होते. पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार प्रदीप रायन्नावार यांनी एक पथकच आरोपीच्या शोधासाठी कामी लावले. आरोपीची बहीण भिवापूरला राहते, हे कळताच पोलीस पथक तिकडे रवाना झाले. तेथून आरोपी बालिकेसह पवनी (खुर्द) कडे गेल्याचे कळताच पोलिसांनी तिकडे धाव घेतली. १८ डिसेंबरला पहाटे ४ च्या सुमारास बालिका पोलिसांच्या हाती लागली. तिची वैद्यकीय तपासणी केली असता बालिकेसोबत आरोपीने अत्याचार केल्याचे उघड झाले. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी आरोपीही पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी त्याला अपहरण, बलात्कार आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक केली.लोकमतमुळे तपासाला गतीपोलिसांकडून मुलीला शोधण्यास विलंब झाल्यामुळे पीडित बालिकेची आई तिच्या नातेवाईकांसह लोकमत कार्यालयात आली. लोकमत प्रतिनिधीने नंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आणि मुस्लीम समाजातील सामाजिक कार्यकर्ते गुलाम अशरफी यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला वेग आला होता. पीडित बालिका सुखरूप आढळल्याने तिच्या आई तसेच नातेवाईकांना आनंद झाला आहे. मात्र, आरोपीने तिच्यासोबत दुष्कृत्य केल्याने त्यांच्यात संतापही आहे.

टॅग्स :Rapeबलात्कारStudentविद्यार्थी