शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचार प्रकरण : त्या मुलीचे अल्पवयीनत्व सिद्ध झाले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 01:29 IST

अत्याचार झाला त्यावेळी पीडित मुलगी अल्पवयीन होती हे सरकार पक्षाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सिद्ध करता आले नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने आरोपीला संशयाचा लाभ देऊन निर्दोष सोडण्याचा आदेश दिला. हे प्रकरण अमरावती जिल्ह्यातील आहे.

ठळक मुद्देआरोपीची निर्दोष सुटका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अत्याचार झाला त्यावेळी पीडित मुलगी अल्पवयीन होती हे सरकार पक्षाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सिद्ध करता आले नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने आरोपीला संशयाचा लाभ देऊन निर्दोष सोडण्याचा आदेश दिला. हे प्रकरण अमरावती जिल्ह्यातील आहे.इत्तरसिंग जनकलाल दहीकर (२८) असे आरोपीचे नाव असून तो रत्नापूर, ता. धारणी येथील रहिवासी आहे. तो ४ मे २०१६ पासून कारागृहात होता. त्याचे पीडित मुलीसोबत प्रेमसंबंध होते. ते २८ एप्रिल २०१६ रोजी पळून गेले. दरम्यान, त्यांनी बरेचदा शारीरिक संबंध ठेवले. मुलगी हरविल्याची तक्रार लगेच पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली नाही. मुलीच्या वडिलाने २ मे २०१६ रोजी तक्रार दिली. त्यानंतर आरोपी व मुलगी स्वत:च गावात परतले. घटनेच्या वेळी पीडित मुलगी १७ वर्षे वयाची होती असा दावा करण्यात आला होता. परिणामी, ४ फेब्रुवारी २०१७ रोजी सत्र न्यायालयाने आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास व २००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास २ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली होती. त्या निर्णयाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात दाखल केलेले अपील मंजूर झाले.पाच हजार रुपये ‘डीबीए’लाउच्च न्यायालयाने आरोपीतर्फे बाजू मांडण्यासाठी अ‍ॅड. राजेंद्र डागा यांची नियुक्ती केली होती. प्रकरणावरील निर्णयानंतर अ‍ॅड. डागा यांना पारिश्रमिक म्हणून पाच हजार रुपये मंजूर करण्यात आले. अ‍ॅड. डागा यांनी ही रक्कम देणगी स्वरूपात नागपूर जिल्हा विधिज्ञ संघटनेला दिली.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयRapeबलात्कार