शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील ‘त्या’ नराधम बापाची शिक्षा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 23:10 IST

स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी दणका दिला. आरोपीची १० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा कायम ठेवण्यात आली. न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी हा निर्णय दिला.

ठळक मुद्देहायकोर्ट : स्वत:च्या मुलीवर केला बलात्कार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी दणका दिला. आरोपीची १० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा कायम ठेवण्यात आली. न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी हा निर्णय दिला.ही घटना यशोधरानगर पोलिसांच्या हद्दीतील आहे. आरोपीने मार्च-२०१४ पासून मुलीवर वारंवार बलात्कार केला. त्यामुळे तिला गर्भधारणा झाली. आजारी पडल्यानंतर मुलीला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले असता, बापाच्या नात्याला काळिमा फासणारी ही घटना उघडकीस आली. २८ आॅगस्ट २०१४ रोजी आरोपीविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. त्यावेळी मुलीच्या पोटात पाच महिन्याचा गर्भ होता. तिने मुलीला जन्म दिल्यानंतर डीएनए चाचणी करण्यात आली. त्यावरून आरोपीचे कुकर्म सिद्ध झाले.विशेष सत्र न्यायालयाने आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. त्या निर्णयाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. १२ जुलै रोजी अपीलवर अंतिम सुनावणी पूर्ण झाल्यानंतर उच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. तो निर्णय मंगळवारी जाहीर करण्यात आला. उच्च न्यायालयात सरकारतर्फे अ‍ॅड. स्वाती कोल्हे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयRapeबलात्कार