शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनचा डीपीआर मार्चमध्ये सादर होणार : रावसाहेब दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2022 18:27 IST

नागपूर-मुंबई बुलेट ट्रेनचा बहुतांश भाग हा एलिवेटेड असेल. त्यामुळे शेतकऱ्यांचे फारसे नुकसान होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देसमृद्धी महामार्गासोबतच बुलेट ट्रेन येणार

नागपूर :मुंबई-नागपूरबुलेट ट्रेनचा विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्चच्या सुरुवातीला सादर केला जाईल. समृद्धी महामार्गासोबतच बुलेट ट्रेन येईल. त्यामुळे फक्त ३० टक्केच जमीन अधिग्रहित करावी लागेल, असे केंद्रीय रेल्वे, कोळसा राज्यमंत्री रावसाहेब दानवे  (Raosaheb Danve) यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

दानवे म्हणाले, नागपूर-मुंबईसह वाराणसी-दिल्ली, अहमदाबाद-दिल्ली या मार्गावरही बुलेटचा डीपीआर लवकरच तयार केला जाणार आहे. नागपूर-मुंबई बुलेट ट्रेनचा बहुतांश भाग हा एलिवेटेड असेल. त्यामुळे शेतकऱ्यांचे फारसे नुकसान होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. नागपूरच्या रेल्वे अजनी स्टेशनच्या विस्ताराच्या कामास लवकरच सुरुवात होणार असल्याचे दानवे म्हणाले. 

केंद्र सरकारने देशभरात १९०० हून अधिक किसान रेल चालविल्या. यात शेतकऱ्यांना माल वाहतुकीवर ५० टक्के अनुदान देण्यात आले असून, ९० कोटींवर निधी खर्च करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

रेल्वेत आता शिजवलेले अन्न

- प्रत्येक रेल्वेत आता पॅन्ट्री कारची व्यवस्था केली जाणार आहे. त्यामुळे रेल्वेत आता पॅक फूड न मिळता पॅन्ट्री कारमध्ये शिजवलेलेच अन्न मिळेल, असेही दानवे यांनी स्पष्ट केले.

अस्तित्व दाखविण्यासाठी काँग्रेसचे आंदोलन

- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना वाढीसाठी महाराष्ट्राला दोष दिला नसून येथील काँग्रेस नेत्यांना जबाबदार ठरविले आहे. देशभरात काँग्रेसचे अस्तित्व संपले आहे. त्यामुळे आता भाजप नेत्यांच्या घरासमोर आंदोलने करून आपले अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न काँग्रेस नेते करीत असल्याची टीका दानवे यांनी केली.

टॅग्स :Politicsराजकारणraosaheb danveरावसाहेब दानवेSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्गBullet Trainबुलेट ट्रेनnagpurनागपूरMumbaiमुंबई