शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

विकासवाटा दर्शविणारा रामझुला वाहतुकीसाठी खुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 21:15 IST

नागपूर शहर संपूर्ण देशात विकासाचे मॉडेल म्हणून पुढे येत आहे. शहरात सर्वत्र सुरू असलेल्या विकासकामांमुळे देशपातळीवर नागपूरने आपली वेगळी छाप सोडली आहे. शहराच्या विकासावाटा दर्शविणाऱ्या रामझुल्याचा दुसऱ्या टप्पा शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या उड्डाण पुलामुळे रेल्वे स्टेशनलगतच्या जयस्तंभ चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहर संपूर्ण देशात विकासाचे मॉडेल म्हणून पुढे येत आहे. शहरात सर्वत्र सुरू असलेल्या विकासकामांमुळे देशपातळीवर नागपूरने आपली वेगळी छाप सोडली आहे. शहराच्या विकासावाटा दर्शविणाऱ्या रामझुल्याचा दुसऱ्या टप्पा शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या उड्डाण पुलामुळे रेल्वे स्टेशनलगतच्या जयस्तंभ चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

लोकार्पण प्रसंगी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, महापौर नंदा जिचकार, खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार सुधाकर कोहळे, डॉ. मिलिंद माने, सुधाकर देशमुख, विकास कुंभारे, मनपा सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, नगरसेवक दयशंकर तिवारी, प्रवीण दटके, बंडू राऊ त, जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, मनपा आयुक्त अभिजित बांगर, मुख्य अभियंता उल्हास देबाडवार, मुख्य अभियंता सुधाकर मुरारे, अधीक्षक अभियंता उज्ज्वल डाबे, मनोज तालेवार आदी उपस्थित होते.पूर्वीच्या अस्तित्वातील १०० वर्षे जुन्या कमानी पुलाऐवजी नवीन ६ पदरी नवीन रेल्वे उड्डाण पूल बांधण्याच्या सुधारित प्रस्तावाप्रमाणे ६९.६२ कोटी खर्च आला आहे. नागपूर शहर एकात्मिक योजनेमध्ये संत्रा मार्केट येथील सहा पदरी केबल स्टेड रेल्वे उड्डाण पुलाचे काम समाविष्ट असून यासाठी ३५० कोटी रुपये खर्चाची योजना बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर मंजूर केली होती.नागपूर शहर एकात्मिक रस्ते विकास योजनेच्या ५१७.३६ कोटी रकमेच्या सुधारित अंदाजपत्रकास शासनाने नुकतीच मंजुरी प्रदान केली आहे. जुना रेल्वे उड्डाण पूल तोडण्याचे काम अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून पूर्ण करण्यात आले. यामध्ये सुमारे १३० टन क्षमतेची क्रेन तसेच वायर सॉ यांचा उपयोग करून पुलाचा प्रत्येक भाग कापून वरचेवर क्रेनने काढण्यात आला. हे काम करताना खाली असणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम होणार नाही याची दक्षता घेण्यात आली. राज्यात अशा स्वरूपाचे केबल स्टेड उड्डाण पूल असून वांद्रे वरळी सागरी सेतू आणि संत्रा मार्केट उड्डाण पुलाचा समावेश आहे. दोन्ही पूल रस्ते विकास महामंडळाने बांधले आहेत.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRamzulaरामझुला