शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

रामटेकचा गड जाणार कुणाच्या ताब्यात?

By admin | Updated: June 9, 2014 01:14 IST

रामटेक विधानसभा मतदारसंघात २00९ च्या निवडणुकीप्रमाणेच यावेळीही चौरंगी लढत होण्याची शक्यता दिसून येत आहे. गोंडवाना गणतंत्र पक्ष ऐनवेळी कोणाला उमेदवार म्हणून पुढे करणार, यावर तेथील निवडणुकीचे

विधानसभा निवडणूक : संभाव्य उमेदवारांची मतदारसंघात भाऊगर्दीगणेश खवसे - नागपूररामटेक विधानसभा मतदारसंघात २00९ च्या निवडणुकीप्रमाणेच यावेळीही चौरंगी लढत होण्याची शक्यता दिसून येत आहे. गोंडवाना गणतंत्र पक्ष  ऐनवेळी कोणाला उमेदवार म्हणून पुढे करणार, यावर तेथील निवडणुकीचे समीकरण अवलंबून असणार आहे. २00९ च्या निवडणुकीत अँड. आशिष जयस्वाल यांनी ३ हजार ३६१ मतांनी काँग्रेसच्या सुबोध मोहिते यांचा पराभव केला. जयस्वाल यांना ४९ हजार  ९३७ तर मोहिते यांना ४६ हजार ५७६ मते मिळाली होती. त्यांच्याखालोखाल मते गोंडवाना गणतंत्र पक्षाचे उमेदवार डी. मल्लिकार्जुन रेड्डी (३४ हजार  ३0४) यांना मिळाली होती. बसपाचे महादेव कामळे (६ हजार ६0२) यांनाही भरघोस मते पडली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजू ठाकरे यांना १ हजार  १६७ मते मिळाली होती. आगामी २0१४ च्या विधानसभा निवडणुकीतही यापेक्षा वेगळे चित्र असणार नाही. शिवसेनेकडून विद्यमान आमदार आशिष जयस्वाल यांनाच  उमेदवारी मिळणार आहे. त्यादृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केले. काँग्रेसने आपला उमेदवार म्हणून कुणा एकाला अद्याप समोर आणलेले नाही. सध्या  काँग्रेसकडून माजी मंत्री रणजित देशमुख यांचे पुत्र डॉ. अमोल देशमुख, चंद्रपाल चौकसे यांची नावे चर्चेत आहेत. त्यांच्यासोबतच राष्ट्रवादीचे डी. मल्लिकार्जुन रेड्डी हे सुद्धा निवडणुकीच्या तयारीत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये ही जागा काँग्रेसकडे गेली आहे.  त्यामुळे या निवडणुकीतही आघाडी कायम राहिल्यास रेड्डी हे बंडखोरी करतील असे दिसते. त्यातल्यात्यात आम आदमी पार्टीकडून योगेश वाडीभस्मे  यांनी तयारी चालविली आहे. त्यादृष्टीने त्यांनी मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवारही पूर्ण ताकदीने  या निवडणुकीत उतरणार असून, बहुजन समाज पक्षाचीही मतांची वेगळी समीकरणे आहेत. त्यामुळे प्रमुख तीन उमेदवारांव्यतिरिक्त बसप, मनसे, आप,  फॉरवर्ड ब्लॉक, गोंडवाना मुक्ती सेना आणि अपक्ष उमेदवार एकूण किती मते जुळवितात त्यावरही रामटेकचा आमदार कोण राहील, हे अवलंबून आहे. सध्या तरी शिवसेना, काँग्रेस, गोंडवाना गणतंत्र पक्ष आणि आप अशी चौरंगी लढत होणार असल्याची चिन्हे दिसत आहे. शिवसेनेकडून उमेदवारी  निश्‍चित आहे. उर्वरित तीन पक्षाकडून ऐनवेळी कोणाचे नाव समोर येते त्यावरही रामटेक विधानसभेत निवडणूक तिरंगी, चौरंगी होते की नाही, हे  निश्‍चित होईल. उमेदवारी निश्‍चित व्हायची असली तरी प्रमुख पक्षाच्या उमेदवारांव्यतिरिक्त अपक्षांनीही कंबर कसली आहे.