शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरजवळ रामटेकमध्ये शोभायात्रेत ‘शेतकरी आत्महत्ये’वरील चित्ररथात तरुणाचा गळफास लागून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 15:03 IST

रामटेक या ऐतिहासिक गावात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आयोजित शोभायात्रेत ‘शेतकरी आत्महत्या’ दाखविणाऱ्या चित्ररथाला सजवणाऱ्या तरुणाचा त्यातच गळफास लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना येथे गुरुवारी रात्री घडली.

ठळक मुद्देआत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याची भूमिका खरी ठरलीचित्ररथाचे परिक्षण करताना लक्षात आली बाब

आॅनलाईन लोकमतनागपूर : रामटेक या ऐतिहासिक गावात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आयोजित शोभायात्रेत ‘शेतकरी आत्महत्या’ दाखविणाऱ्या चित्ररथाला सजवणाऱ्या तरुणाचा त्यातच गळफास लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना येथे गुरुवारी रात्री घडली.गळफास लागून त्या तरुणाचा मृत्यू झालेला असताना हा चित्ररथ रामटेकच्या गल्ल्यांतून फिरत होता. त्यानंतर ही बाब लक्षात येताच खळबळ उडाली.मनोज अरुण धुर्वे (२८, रा. संग्रामपूर, ता. रामटेक, जि. नागपूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. रामटेक येथे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ऐतिहासिक शोभायात्रा काढण्यात येते. या शोभायात्रेत विविध सामाजिक विषयांवरील चित्ररथ साकारले जाऊन समाजाचे प्रतिबिंब त्याद्वारे दर्शविले जाते. अठराभुजा गणेश मंदिरात गणेशाची पाद्यपूजा केल्यानंतर गुरुवारी रात्रीच्या सुमारास या शोभायात्रेला प्रारंभ झाला.या शोभायात्रेत धार्मिक, सामाजिक, पौराणिक आणि सांस्कृतिक विषयावरील चित्ररथ सहभागी करण्यात आले होते. काहींनी जिवंत देखावे तयार केले. त्यापैकीच राजेश सरवर याच्या नेतृत्वात ‘कास्तकाराची आत्महत्या’ या चित्ररथात मनोज धुर्वे हा गळफास लावलेला शेतकरी म्हणून सहभागी झाला होता. बसस्टँडमार्गे शोभायात्रा आंबेडकर चौकात पोहोचली. तिथे सर्व चित्ररथांचे परीक्षण करण्यात आले. तेथून पुढे जाऊन गांधी चौकात रात्री ११.३० वाजताच्या सुमारास चित्ररथाचे परीक्षण करीत असताना मनोज हा काहीच हालचाल करीत नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आयोजकांना शंका येताच त्यांनी मनोजला रुग्णालयात हलविले. तिथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. ‘शेतकरी आत्महत्या’साठी त्याने उपयोगात आणलेल्या दोराचाच गळफास लागून मनोजचा मृत्यू झाला.आंबेडकर चौकापासून ही शोभायात्रा थोडी पुढे जाताच मनोजचा मृत्यू झाला होता. मात्र त्यानंतरही शेतकरी आत्महत्या खरीखुरी असेल, असे समजून आयोजकांनी चित्ररथ गांधी चौकापर्यंत नेला, हे विशेष! या घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Accidentअपघात