शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

२०२४ मध्ये रामटेक लोकसभेचा खासदार भाजपचा : देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 21:37 IST

राज्यामध्ये शिवसेनेने केलेला विश्वासघात, जिल्हा परिषदेत शिवसेनेमुळे झालेला पराभव या पार्श्वभूमीवर भाजपने आता रामटेकचा गड स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देभाजपचा शहर व जिल्हा कार्यकर्त्यांचा मेळावा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : राज्यामध्ये शिवसेनेने केलेला विश्वासघात, जिल्हा परिषदेत शिवसेनेमुळे झालेला पराभव या पार्श्वभूमीवर भाजपने आता रामटेकचा गड स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी झालेल्या भाजप कार्यकर्ता मेळाव्यातून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी २०२४ मध्ये रामटेक लोक सभेचा खासदार भाजपचा बनेल, असा दावा केला.भारतीय जनता पक्षाच्या वतीने गीता मंदिर सभागृहात शहर व जिल्हा कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. मेळाव्याला केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश उपाध्यक्ष सुधाकर देशमुख, प्रदेश महामंत्री रामदास आंबटकर, निवडणूक प्रमुख व माजी आमदार अतुल देशकर, आमदार कृष्णा खोपडे, विकास कुं भारे, मोहन मते, समीर मेघे, गिरीश व्यास, प्रा. अनिल सोले, माजी आमदार सुधाकर कोहळे, डॉ. मिलिंद माने, सुधीर पारवे, मल्लिकार्जुन रेड्डी, उपमहापौर मनीषा कोठे, माजी महापौर नंदा जिचकार, माजी जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, संदीप जाधव, सुभाष पारधी, रमेश मानकर, उपेंद्र कोठेकर, उकेश चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित नेत्यांनी कार्यकर्त्यांना सध्याच्या परिस्थितीवर आणि पुढे येणाऱ्या आव्हानावर भाष्य करीत कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढविला.

शिवसेनेच्या भगव्याचा रंग फिका पडलाय!  मुख्यमंत्र्यांचा रिमोट दुसऱ्याच्या हातात

 कधीकाळच्या आमच्या मित्रपक्षाने आता रंग बदलला आहे. त्याच्या भगव्या रंगावर दुसºया पक्षाचा रंग चढला आहे. त्यामुळे भगव्याचा रंग आता फिका पडला आहे. आमचा रंग बदललेला नाही, असे म्हणणारी शिवसेना राष्ट्रपुरुषांचा अपमान होत असताना चूप का बसत आहे. राष्ट्रहिताच्या विरोधात काम होत असताना ते कुठलाही बाणा दाखवीत नाहीत, राष्ट्रवादाचा विचार त्यांचा बदलला आहे. राज्यात शिवसेनेने सत्ता स्थापन केली आहे, मात्र सत्तेच्या दडपणाखाली शिवसेना वावरत आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनीे केली. 

 खोट्या गोष्टी सांगून अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्ननागरिकता कायद्याच्या विरोधात देशामध्ये वेगळे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.  राष्ट्रीय हिताच्या विषयावर देखील मतांचे राजकारण होऊ लागले आहे. समाजामध्ये देशविरोधी विष कालवून अस्थिरता, अराजकता काही पक्ष निर्माण करीत आहे. या देशात एक कोटी नागरिकांना बांगला देश, पाकिस्तान, अफगाणिस्तानातून प्रताडीत होऊन आले आहे. त्यांच्यावर अत्याचार झाले आहे. गेल्या ४० वर्षापासून ते लोक भारतात राहत आहे. त्यांना भारताची नागरिकता मिळू शकली नाही. त्यामुळे सरकारने या लोकांना भारतीय नागरिकता देण्यासाठी संशोधन विधेयक तयार करून कायदा केला. याचा अर्थ कुणाची नागरिकता हिसकावण्यात येणार नाही, कुणाला देशाबाहेर काढण्यात येणार नाही. परंतु काही लोक या कायद्याच्या नावारून समाजाला भडकविण्याचे काम करीत आहे,  खोट्या गोष्टी सांगून अराजकता पसरवित आहे.  त्यामुळे या अराजकतेला उत्तर द्यायचे आहे. देशहितासाठी उभे रहायचे आहे, असे आवाहन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्ता मेळाव्यात केले. फडणवीस म्हणाले की, जिल्हा परिषदेत आलेल्या अपयशामुळे जिल्ह्यातील भाजपाची ताकद कमी झाली नाही. कार्यकर्त्यांमुळे पक्षाची पाळेमुळे खालपर्यंत रोवली आहेत. कार्यकर्त्यांनी पराभवाने खचून न जाता पराभवाचे आत्मचिंतन करून पुन्हा ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंतच्या निवडणुकीच्या तयारीला लागावे.दटकेंची फेरनिवड, जिल्हाध्यक्षपदी गजभिये 

मेळाव्यात निवडणूक अधिकारी व माजी आमदार अतुल देशकर यांनी प्रवीण दटके यांची शहर अध्यक्ष व अरविंद गजभिये यांची जिल्हाध्यक्ष म्हणून घोषणा केली. यावेळी बोलताना गजभिये म्हणाले की, भाजपामध्ये कामाची किंमत होते. माझी निवड करून पक्षाने त्याची पावती दिली आहे. पक्षाचे संघटन आणखी मजबूत करून २०२४ च्या निवडणुकीत जिल्ह्यातील सहाही आमदार निवडून आणण्याचा दावा केला. तर प्रवीण दटके यांनी शहरातील सहाही आमदारांसोबत २०२२ मध्ये होणाऱ्या मनपाच्या निवडणुकीत १२५ जागा निवडून आणण्याचा निश्चय व्यक्त केला.आत्मविश्वास जागवून पक्षविस्तार करा : गडकरी 
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना गाव, गरीब, मजूर, शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन विकासाकरिता संघर्ष, आंदोलन व संघटनेचा विस्तार करण्याचे आवाहन केले. निवडणुकीत जय-पराजय होत असतात, शहरात आणि जिल्ह्यात आजही भाजपची ताकद कायम आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपल्यातील आत्मविश्वास जागवून पक्षाचा विस्तार करावा, असे आवाहन केले. विधानसभेच्या निवडणुकीत आपण थोडे मागे आलो. जि.प.मध्ये शिवसेनेच्या भूमिकेमुळे मतांचे विभाजन होऊन १२ जागांचा फटका बसला. यापासून धडा घेऊन पक्ष संघटन पुन्हा मजबूत करीत पराभवाचा वचपा काढण्याचे आवाहन चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा