शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

रामटेकमध्ये महाकवी कालिदासाच्या नशिबी विरह वेदनाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:06 IST

राहुल पेठकर रामटेक : महाकवी कालिदासाचे महाकाव्य उत्कृष्ट काव्याचा नमुना म्हटले जाते आणि जगभरात त्यांच्या काव्यावर संशोधन सुरू आहे. ...

राहुल पेठकर

रामटेक : महाकवी कालिदासाचे महाकाव्य उत्कृष्ट काव्याचा नमुना म्हटले जाते आणि जगभरात त्यांच्या काव्यावर संशोधन सुरू आहे. कालिदासाने आयुष्यभर अनुभवलेला प्रेमविरह अनेकांच्या जास्त ओळखीचा आहे आणि त्याची तीव्रता अजरामर अशा मेघदूतमधील ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ या ओळीने आणखीनच प्रखर होते. कालिदासाच्या आयुष्याचा तो विरह कधी संपणार हा प्रश्न आहे. रामटेकमध्ये असलेल्या कालिदास स्मारकाची दुरवस्था बघून, हा प्रश्न अधिकच प्रबळ होतो.!

‘आषाढस्य प्रथम दिवसे’ म्हटले की आपल्याला आठवण येथे महाकवी कालिदासांची....त्यामुळे आषाढाचा पहिला दिवस महाकवी कालिदास दिवस म्हणूनही साजरा केला जातो.

‘कालिदासांच्या’या आठवणी जपल्या जाव्या यासाठी येथे कालिदास स्मारक तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. १० डिसेंबर १९६८ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या उपस्थितीत या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले होते. ३ लाख ४९ हजार रुपये खर्च करून हे स्मारक उभारले. त्याचे उद्घाटन १२ डिसेंबर १९७३ ला झाले.

या स्मारकात कालिदासाची तीन महाकाव्य मेघदुतम्, कुमारसंभवम् आणि रघुवंशम् तसेच तीन नाटके मालविकाग्निमित्रम्, विक्रमोर्वशीयम्,आणि शाकुंतलम् यातील विविध प्रसंगावर भारतातील विख्यात चित्रकार मधु पोवळे, मुरली लाहोटी,वासुदेव स्मार्त, शांताराम कामत, दिनेश शाह आणि वामन करंजेकर यांनी काढलेली तैलचिञे लावली आहेत. या स्मारकाच्या दिमतीला तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक व माजी मंत्री स्व.मधुकरराव किंमतकर यांच्या कल्पनेतून एक भव्य ओमची निर्मिती करण्यात आली. जयपुरी दगडात बांधलेली ही वास्तू अद्वितीय आहे. तिथे टाईल्सच्या तुकड्यापासून कालिदासाच्या नाटकातील प्रसंग रेखाटले आहेत. यासाठी स्व.श्रीकांत जिचकार यांनी पुढाकार घेतला होता. ‘ओम’च्या आत पर्यटकांना आकर्षित करणारे संगीत कारंजे लावले आहे. बगिचा बनविला. अतिशय सुंदर असे हे ठिकाण बनविले गेले. त्यानंतर हे नगर परिषदेकडे सुपूर्द करण्यात आले.

नगर परिषदेने ठरविले असते आणि शासनाने मदत केली असती तर हे जागतिक कीर्तीचे पर्यटनस्थळ झाले असते. पण तसे झाले नाही. आज बगिचा उजाड झाला आहे. संगीत कारंजे बंद पडले आहे. भित्तीचित्र नीरस झाले आहे. काही दिवसापूर्वी तर येथे वीज पुरवठाही नव्हता. आता वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. मात्र विद्युत रोशणाई नसल्यात जमा आहे. या भागात वृक्ष लागवड केली गेली नाही. त्यामुळे हा भाग ओसाड झाला आहे.

आषाढस्य प्रथम दिवसे सगळीकडे साजरा होत असताना रामटेक नगर परिषदेचे याकडे दुर्लक्ष होताना दिसते. ना रोषणाईची व्यवस्था ना कोणता कार्यक्रम. रामटेकचे काही कवी मात्र या दिवसाची आठवण म्हणून कालिदासाच्या या रमणीय सहवासात दरवर्षी कविसंमेलन घेत असतात. संस्कृत विद्यापीठाच्या सहकार्याने येथे कविसंमेलन घेण्यात आले आहे.

--

कालिदास स्मारकबाबत नगर परिषदेने एक ठराव घेतला आहे. यामध्ये संस्कृत विद्यापीठाने कालिदास स्मारकारच्या देखभालीचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार यात्रा विकास समितीने हा प्रस्ताव मंजूर केला. त्यानुसार पुढील कारवाईसाठी तो जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने काही माहिती मागितली आहे. त्याची पूर्तता झाली की रीतसर या स्मारकाचे हस्तांतरण विद्यापीठाला होईल.

- हर्षल गायकवाड, मुख्याधिकारी, रामटेक, नगर परिषद