शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
2
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
3
देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, मनसे महायुतीत येण्याचा सध्यातरी ‘स्कोप’ नाही
4
कसब्यात हिंदू महासंघाचा मनसे उमेदवाराला पाठिंबा; मतदारसंघात मतांचं गणित बदलणार?
5
जगभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी, न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंग दिव्यांनी उजळून निघाली
6
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
7
भाजपचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते भुलाई भाई यांचे निधन; वयाच्या 111 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
9
मेगा लिलावाआधी प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
17
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
19
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

रामलल्ला २२ जानेवारीला अयोध्येतील मंदिरात प्रवेश करेल; मोहन भागवतांनी देशाचा विकास सांगितला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 9:45 AM

Mohan Bhagwat Speech On RSS Dasara Nagpur 2023: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवाला नागपुरातील रेशीमबाग मैदानावर सुरुवात झाली.

भारताचा गौरव दरवर्षी वाढतच चालला आहे. जसे की जी २० परिषद इथे झाली. ती तर दरवर्षीच होते. परंतू, इथे झाले ते महत्वाचे होते. त्या परिषदेत भारतीयांच्या आदरातिथ्याची प्रशंसा झाली. विविधतेने नटलेल्या संस्कृतीचा गौरव केला, तसेच आमच्या स्वप्नांचे उड्डाण जगभरातल्या लोकांनी पाहिले, असे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले. याचबरोबर भागवत यांनी रामलल्ला अयोध्येच्या मंदिरात २२ जानेवारीला प्रवेश करेल, अशी घोषणाही केली. 

आशियाई खेळांतही आपल्या खेळाडूंनी मोठ्या प्रमाणावर पदके पटकावली आहेत. डिजिटल तंत्रज्ञानाचा गरीबांच्या कल्याणासाठी वापर केला गेला. स्टार्टअपमध्ये क्रांती झाली. संरक्षण असेल की कृषी सर्वच क्षेत्रात प्रगती पाहिली आहे. अर्थव्यवस्थेत सुधारणा होत आहे. दहाव्या स्थानावरुन पाचव्या स्थानावर आलो आहोत, असे भागवत म्हणाले. 

आमचे राष्ट्रीय आदर्श भगवान राम यांचे मंदिर अयोध्येत बनत आहे. रामांचे बालस्वरुप या मंदिरात २२ जानेवारीला प्रवेश करेल. तिथे आपण तेव्हा जाऊ शकणार नाही. सुरक्षेचा विषय असेल. तेथील व्यवस्थांचा मुद्दा असेल. हळूहळू आपापल्या वेळेनुसार तिकडे जाऊ, असे भागवत म्हणाले. 

आपल्या आदर्श जीवनातून संपूर्ण जगाला अहिंसा, करुणा आणि नैतिकतेचा मार्ग दाखविणाऱ्या महावीर स्वामींचे २५५० वे निर्वाण वर्ष आपण साजरे करत आहोत. आपल्या तरुणपणापासूनच देशाच्या स्वातंत्र्यासाठी लोकांना जागृत करणारे तमिळ संत श्रीमद रामलिंग वल्लार यांच्या 200 व्या जयंती उत्सवाचा कार्यक्रम आम्ही नुकताच साजरा केला. गरिबांना अन्नदान करण्यासाठी त्यांनी पेटवलेली चूल आजही तामिळनाडूत जळत आहे, असे भागवत म्हणाले. या वर्षी कोल्हापूरचे (महाराष्ट्र) राज्यकर्ते छत्रपती शाहूजी महाराज यांची 150 वी जयंती देखील साजरी केली जात आहे. कल्याणकारी आणि प्रशासकीय चतुराईने आपले जीवन सामाजिक विषमता दूर करण्यासाठी समर्पित केले, असेही भागवत म्हणाले. 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघDasaraदसरा