शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या रामदासपेठेतील पॉश कुंटनखान्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 00:09 IST

रामदासपेठेतील एका पॉश इमारतीत परिमंडळ दोनचे उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या पथकाने छापा मारून स्पा च्या आड चालणारा कुंटणखाना उजेडात आणला. या प्रकरणी स्पा मालकासह पाच जणांना अटक करण्यात आली असून, एक जण फरार आहे.

ठळक मुद्देस्पा च्या आड वेश्याव्यवसाय : पाच वारांगना आढळल्या : पोलीस उपायुक्त पंडित यांच्या पथकाची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रामदासपेठेतील एका पॉश इमारतीत परिमंडळ दोनचे उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या पथकाने छापा मारून स्पा च्या आड चालणारा कुंटणखाना उजेडात आणला. या प्रकरणी स्पा मालकासह पाच जणांना अटक करण्यात आली असून, एक जण फरार आहे.रामदासपेठेतील अजय सर्व्हिस अपार्टमेंटच्या तळ माळ्यावर आरोपी अजय आणि त्याचा भाऊ अभय लोहारकर स्पा चालवतात. दुसऱ्या माळ्यावर जीम असून, अन्य पाच माळ्यांवर हॉटेलसारख्या रूम आहेत. येथे लोहारकर बंधू स्पा च्या नावाखाली कुंटणखाना चालवितात, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्याची शहानिशा करून उपायुक्त पंडित यांच्या पथकाने तेथे छापा मारण्यासाठी सापळा रचला. त्यानुसार, एका ग्राहकाला लोहारकरकडे पाठविण्यात आले. त्याने २५०० हजारात देहविक्रय करणारी वारांगना उपलब्ध करून देण्याचा सौदा केला. अजय लोहारकर तसेच स्पा चा व्यवस्थापक आलम मोहम्मद अब्बास याने रक्कम घेतल्यानंतर पाच वारांगना ग्राहकाला दाखवल्या. त्यातील एकीला पसंत करून ग्राहक एका रुममध्ये गेला. ठरल्याप्रमाणे इमारतीला घेराव घालून असलेले पोलीस पथक काही वेळेतच तेथे धडकले. पोलिसांचा छापा पडल्याचे लक्षात आल्यामुळे तेथून पळू पाहणारा अजय लोहारकर, मोहम्मद आलम, हेअर सलून करणारा विनेंद्र उरकुडे, गार्ड म्हणून असलेला संदीप मिश्रा तसेच एका वारांगनेसोबत असलेला ग्राहक अजय खडतकर या पाच जणांना पोलिसांनी पकडले. तेथे पाच वारांगना आढळल्या. पोलिसांनी त्यांची माहिती घेऊन त्यांना सोडून दिले.कोहिमा, अरुणाचलम प्रदेशच्या तरुणीअजय स्पा अ‍ॅन्ड सलूनच्या आड चालणाऱ्या कुंटणखान्यावर पोलिसांनी पकडलेल्या पाच वारांगनांपैकी एक कोहिमाची होती. तिने तसेच अन्य जणांनी पोलिसांना धंतोलीत अजय संचलित करणाऱ्या एका हॉटेलचे नाव सांगितले.त्यानुसार, पोलीस पथकाने तेथेही छापा मारला. तेथे तीन तरुणी आढळल्या. त्यातील एक तरुणी अरुणाचल प्रदेशची होती. तेथे मात्र, ठोस असे काही आढळले नाही. त्यामुळे पोलिसांनी त्यांना चौकशी करून सोडून दिले. दरम्यान, सीताबर्डी पोलीस ठाण्यात आरोपी लोहारकर बंधू, त्याचा व्यवस्थापक मोहम्मद आलम, हेअर सलून करणारा विनेंद्र उरकुडे, गार्ड संदीप मिश्रा तसेच ग्राहक खडतकरविरुद्ध पिटा अ‍ॅक्टनुसार कारवाई करण्यात आली. पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार हेमंत कुमार खराबे, पीएसआय सचिन मते, धनश्री खुटेमाटे तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :sex crimeसेक्स गुन्हाnagpurनागपूर