शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
2
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
3
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
4
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
5
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
6
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
7
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
8
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
9
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
10
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
11
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
12
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
13
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
14
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
15
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
16
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
17
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
18
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
19
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
20
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर

समाजावर संस्कार करते रामकथा

By admin | Updated: January 12, 2016 03:24 IST

संपूर्ण रामकथेमध्ये सामाजिक जीवन समृद्ध करणारे संस्कार सामावलेले आहेत, असे प्रतिपादन विजय कौशल महाराज यांनी केले.

विजय कौशल महाराज : रामकथा ज्ञानयज्ञ महोत्सवाला सुरुवातनागपूर : संपूर्ण रामकथेमध्ये सामाजिक जीवन समृद्ध करणारे संस्कार सामावलेले आहेत, असे प्रतिपादन विजय कौशल महाराज यांनी केले. श्री रामदेवबाबा सार्वजनिक समितीतर्फे काटोल रोडवरील श्री रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित श्री रामकथा ज्ञानयज्ञ महोत्सवाला सोमवारपासून सुरुवात झाली. महोत्सवात बोलताना विजय कौशल महाराज यांनी रामकथेचे महत्त्व सांगितले. ते म्हणाले, भगवान शिव हे देवी पार्वती यांना रामकथा सांगण्यापूर्वी त्यामागची भूमिका स्पष्ट करतात. या भूमिकेपासून रामकथेला सुरुवात होते. भगवान शिव हे पार्वतीला म्हणतात, देवी तूने समाजासाठी कल्याणकारी व पवित्र रामकथा ऐकविण्याचा आग्रह केला आहे. यामुळे तुझ्यासारखा भाग्यवान या जगात दुसरा कोणीच नाही. देव निर्गुण व निराकार आहे किंवा तो न निर्गुण आहे न निराकार. नास्तिक लोक देवाचे अस्तित्व व त्यांच्या भक्तीवर नाना टीका करतात. देवाला नैवेद्य का ठेवायचा, मूर्तीची पूजा कशाला करायची, देव बोलत का नाही असे प्रश्न विचारले जातात. वास्तविक देव तोच आहे, जो भक्ताच्या मनात असलेल्या रूपात प्रगट होतो. भक्तासाठी देव नोकर, मित्र, सहकारी यासह कित्येक विविध रूपात प्रगट झाले आहेत. अशा अनेक घटना भक्तांच्या जीवनचरित्रांमध्ये आहेत.यापुढे महाराजांनी सांगितले की, पतीने स्वत:च्या पत्नीपासून काहीच लपवायला नको. पत्नीशी लपवाछपवी खाईत जाण्यासारखे आहे. पत्नीला सर्व गोष्टी सांगितल्या पाहिजे.याप्रसंगी प्रामुख्याने महापौर प्रवीण दटके, आमदार अनिल सोले, सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, मिलिंद माने, समितीचे अध्यक्ष बनवारीलाल पुरोहित, गोविंदलाल अग्रवाल, पोद्दारेश्वर राममंदिरचे विश्वस्त प्रदीप अग्रवाल, रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश पांडे, प्रा. निरंजन देशकर, विहिंपचे अजय निलदावार, प्रदीप सिंह, समाजसेवक जयप्रकाश गुप्ता, मुन्ना महाजन, श्रीकांत देशपांडे, राजेंद्र पुरोहित उपस्थित होते. रामकथा १८ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. कथेची वेळ दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत आहे.(प्रतिनिधी)