शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

७ फेब्रुवारी रोजी नागपुरात होणार रमाईचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 10:55 IST

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यात त्यांच्या पत्नी रमाई आंबेडकर यांचाही मोलाचा वाटा आहे. त्यामुळे यंदा नागपुरात रमाईच्या कार्यावर प्रकाश टाकण्यासाठी रमाईचा जागर होणार आहे.

ठळक मुद्देरमाईचे भाचे व नातसून येणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यात त्यांच्या पत्नी रमाई आंबेडकर यांचाही मोलाचा वाटा आहे. त्यामुळे यंदा नागपुरात रमाईच्या कार्यावर प्रकाश टाकण्यासाठी रमाईचा जागर होणार आहे. यासाठी रमाईच्या जयंतीनिमित्त विविध संघटनांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यासोबतच रमाई आंबेडकर यांचे भाचे व नातसून सुद्धा नागपुरात येणार आहेत हे विशेष.स्त्रीभूषण रमाई आंबेडकर संस्थेच्यावतीने डॉ. आंबेडकर महाविद्यालय दीक्षाभूमी येथील दादासाहेब कुंभारे सभागृह येथे ७ फेब्रुवारी रोजी रमाई आंबेडकर जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला रमाई आंबेडकरांचे भाचे उमेश शंकर धात्रे (मुंबई) आणि नातसून विनिता विजय धात्रे (वणंद) हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यासोबतच भदंत नागदीपंकर, आशा मडावे, लता राजगुरू, अनिल वासनिक, दिलीप वानखेडे, अमोल साळुंखे, दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे, महेंद्र मडावे प्रमुख पाहुणे राहतील. राजकुमार वंजारी हे अध्यक्षस्थानी राहतील. तसेच यादव मेश्राम, ईश्वरदास बन्सोड, कुवर रामटेके, नवल राजेंद्र कापसे प्रामुख्याने उपस्थित राहतील. यावेळी स्त्रीभूषण रमाई हिंदी पुस्तकाचे प्रकाशन आणि विविध क्षेत्रात नावलौकिक करणाऱ्या रमाईच्या लेकींचा तसेच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचा कार्य गौरव होईल.

भगवाननगरात रमाई जन्मोत्सवप्रियदर्शी सम्राट अशोक बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने ७ फेब्रुवारी रोजी भगवाननगर पोस्ट आॅफिस ग्राऊंडवर रमाई जन्मोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त आनंदराज आंबेडकर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहतील. त्यासोबतच देशभरात गाजत असलेले ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ हे महानाट्य सादर करण्यात येणार आहे. याशिवाय विविध कार्यक्रम होतील. संस्थेचे सल्लागार शिरीश फुलझेले यांनी पत्रपरिषदेत ही माहिती दिली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अनिकेत कुत्तरमारे, शितल गडलिंग, सिद्धार्थ बनसोड, शुभम दामले पंकज नाखले, नंदू पारखंडे उपस्थित होते.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर