शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंधळात गोंधळ: ससूनमधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी SIT, मात्र अध्यक्षावरच आहेत भ्रष्टाचाराचे आरोप!
2
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
3
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
4
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
5
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
6
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
7
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
8
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
9
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

राजीव गांधी हे तंत्रज्ञानाचे महामेरू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 10:57 PM

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या युवकांना मतदानाचा अधिकार दिला. विकास कामांमध्ये स्त्री-पुरुषांना सारखा अधिकार देण्यात यावा आणि ग्रामीण भागातील यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी त्यांनी पावले उचललेली होती. इतकेच नव्हे तर १९८७ ला राजीव गांधी यांनी पंचायत राज धोरणांच्या माध्यमातून अनेक अलौकिक व समाजोपयोगी कामे केली. भारतातील अनेक राज्यांत शहरी ते ग्रामीण पातळीवर तंत्रज्ञानाला विकसित करणारे, तंत्रज्ञानाचे महामेरू होते, अशा शब्दात मान्यवरांनी राजीव गांधी यांना श्रद्धांजली अर्पण केली.

ठळक मुद्देशहर काँग्रेसतर्फे आदरांजली : विविध संस्था, संघटनांतर्फे नमन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या युवकांना मतदानाचा अधिकार दिला. विकास कामांमध्ये स्त्री-पुरुषांना सारखा अधिकार देण्यात यावा आणि ग्रामीण भागातील यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी त्यांनी पावले उचललेली होती. इतकेच नव्हे तर १९८७ ला राजीव गांधी यांनी पंचायत राज धोरणांच्या माध्यमातून अनेक अलौकिक व समाजोपयोगी कामे केली. भारतातील अनेक राज्यांत शहरी ते ग्रामीण पातळीवर तंत्रज्ञानाला विकसित करणारे, तंत्रज्ञानाचे महामेरू होते, अशा शब्दात मान्यवरांनी राजीव गांधी यांना श्रद्धांजली अर्पण केली.माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांची ७४ वी जयंती नागपूर शहर काँग्रेस कमिटीतर्फे साजरी करण्यात आली. शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात माजी केंद्रीय राज्यमंत्री विलास मुत्तेमवार यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी अ‍ॅड.अभिजित वंजारी, अतुल कोटेचा, उमाकांत अग्निहोत्री, विशाल मुत्तेमवार, रामगोविद खोब्रागडे, सरचिटणीस डॉ.गजराज हटेवार,माजी विरोधी पक्षनेता संजय महाकाळकर, प्रशांत धवड, रमण पैगवार, जयंत लुटे, प्रा.दिनेश बानाबाकोडे, संदेश सिंगलकर, विवेक निकोसे आदी उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उमेशबाबू चौबे व केरळ पुरात मृत झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. केरळच्या पूरग्रस्तांना मदत करणार असल्याचे विकास ठाकरे यांनी जाहीर केले. कार्यक्रमाला वीणा बेलगे, अ‍ॅड.अक्षय समर्थ, रवी गाडगे, राजेश नंदनकर, नरेश शिरमवार, पवन शर्मा, चंद्रकांत गोहणे, वासुदेव ढोके, गीता काळे, उज्ज्वला बनकर, रमेश पुणेकर, रश्मी धुर्वे, संदीप सहारे, इरशाद अली, वासुदेव ढोके, बॉबी दहीवाले, इरशाद मलिक, धरम पाटील आदी उपस्थित होते.नागपूर सुधार प्रन्यास माजीप्रधानमंत्री राजीव गांधी यांची जयंती सद्भावना दिवस म्हणून साजरी करण्यात आली. यानिमित्त प्रतिज्ञा घेण्यात आली. स्टेशन रोड मार्गस्थित नासुप्र मुख्यालयाच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात महाव्यवस्थापक अजय रामटेके यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी रामटेके यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाºयांना सद्भावनेची प्रतिज्ञा दिली. याप्रसंगी कार्यकारी अधिकारी प्रशांत भांडारकर, सचिव-२ योगिराज अवधूत यांच्यासह नासुप्रचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.राष्ट्रवादी काँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राजीव गांधी चौक वर्धा रोड येथे स्थापन केलेल्या राजीव गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माजी आमदार दीनानाथ पडोळे व माजी शहर अध्यक्ष दिलीप पनकुले यांनी आदरांजली अर्पण केली. यावेळी विभागीय अध्यक्ष देवीदास घोडे, तात्या मते, अशोक राऊत, भाई मोहोड, सोपानराव शिरसाट, संजय शेवाळे, विजय मसराम, वसंत घटाटे, प्रमोद जोंधळे, विकास गेडाम, विक्रांत तांबे, ईश्वर दहिकर, बबलू चौहान, विलास पोटफोडे, रामभाऊ धुर्वे, बबलू चौहान, राजेश टेंभुर्णे आदी उपस्थित होते. .

टॅग्स :Rajiv Gandhiराजीव गांधीnagpurनागपूर