शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

राजीव गांधी पंचायत अभियानाच्या कर्मचाऱ्यांना लागली घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 00:34 IST

पंचायत राज कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या हेतूने २०१४ या वर्षात राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान सुरू करण्यात आले होते. परंतु शासनाने या अभियानाचे रूपांतर राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानात करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु या अभियानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना समायोजित करण्याऐवजी त्यांना ३१ मार्चपर्यंत इतर नोकरी शोधण्याचे आदेश शासनाने दिल्याने, राज्यभरात या अभियानात कार्यरत १०८ कर्मचाऱ्यांना बेकार होण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देशासनाने अभियानाचे केले दुसऱ्या योजनेत रूपांतर३१ मार्चपूर्वी इतर नोकरी शोधण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंचायत राज कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या हेतूने २०१४ या वर्षात राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान सुरू करण्यात आले होते. परंतु शासनाने या अभियानाचे रूपांतर राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानात करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु या अभियानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना समायोजित करण्याऐवजी त्यांना ३१ मार्चपर्यंत इतर नोकरी शोधण्याचे आदेश शासनाने दिल्याने, राज्यभरात या अभियानात कार्यरत १०८ कर्मचाऱ्यांना बेकार होण्याची वेळ आली आहे.नागपूर जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागात दोन पदे कार्यरत आहेत़ विदर्भात या पदांची संख्या ४१ इतकी आहे़ ही सर्व पदे कंत्राटी तत्त्वावर आहेत़ २० फेब्रुवारीला शासनाने काढलेल्या आदेशामुळे आपली नोकरी जाईल, ही चिंता त्यांना सतावते आहे़ वस्तुत: राजीव गांधी पंचायत अभियान आणि राष्ट्रीय ग्राम स्वराजचा हेतू एकच आहे़ कार्यरत कर्मचाऱ्यांचे समायोजन करून ही योजना त्यांच्याच अनुभवाच्या जोरावर अधिक कारणी लागली असती़ असे न करता शासनाने सेवा संपुष्टात आणण्याची तंबी त्यांना दिली आहे. ग्रामविकास विभागाचे कार्यासन अधिकारी शशांक बर्वे यांच्या स्वाक्षरीने हा आदेश जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाला प्राप्त झाला आहे़ ही योजना आदिवासीबहुल जिल्ह्यात पेसाअंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये राबविण्यात येते. पेसा समन्वयक या नावाने योजनेतील कंत्राटी कर्मचारी काम करतात़ ती पदे जवळपास २,६६७ इतकी आहे़ ही पदे शासनाच्या मोहिमा, योजनांची जनजागृतीसाठी मदत करतात़ १०८ पदे अंमलबजावणीसाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. आठ दिवसानंतर नोकरी जाणार या भीतीने सर्व कर्मचारी हतबल झाले आहेत़ पुढे काय, असा प्रश्न या कर्मचाऱ्यांना आहे़

टॅग्स :Employeeकर्मचारीgram panchayatग्राम पंचायत