शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

राजेंद्र गवई यांची काँग्रेसवर नाराजी : आघाडीतून बाहेर पडण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 19:38 IST

काँग्रेससोबत असलेले रिपाइंचे नेते डॉ. राजेंद्र गवई यांनी काँग्रेस निवडून न येणाऱ्या जागाही मित्र पक्षासाठी सोडण्यास तयार नसल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर व अचलपूर या दोन जागा रिपाइंसाठी न सोडल्यास आघाडीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे.

ठळक मुद्देदर्यापूर व अचलपूरची जागा सोडावी : पडलेल्या जागाही काँग्रेंस सोडायला तयार नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी काँग्रेससोबत राहील की नाही, याबाबत काँग्रेस अजूनही अंतिम निर्णय घेऊ शकलेली नाही. दुसरीकडे काँग्रेससोबत असलेले रिपाइंचे नेते डॉ. राजेंद्र गवई यांनी काँग्रेस निवडून न येणाऱ्या जागाही मित्र पक्षासाठी सोडण्यास तयार नसल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर व अचलपूर या दोन जागा रिपाइंसाठी न सोडल्यास आघाडीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे.शनिवारी रविभवन येथे पत्रपरिषद घेऊन त्यांनी यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. डॉ. राजेद्र गवई यांनी सांगितले की, गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही भाजप-शिवसेना युतीला हरवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला साथ दिली. अमरावती येथून आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांना निवडून आणले. तेव्हा आम्ही लोकसभेची एकही जागा मागितली नव्हती. परंतु विधानसभेसाठी आम्हाला जास्त जागा सोडाव्या लागतील, असे तेव्हा आम्ही त्यांना सांगितले होते. आता विधानसभेसाठी आम्ही काँग्रेसकडे १० जागांची मागणी केली आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर व अचलपूर या दोन मतदार संघाचाही समावेश आहे. या दोन्ही मतदार संघातून काँग्रेस गेल्या अनेक वर्षात निवडून आलेली नाही. येथे रिपाइं स्वतंत्र लढल्यास दुसऱ्या क्रमांकावर राहते. तेव्हा या दोन्ही जागा रिपाइंसाठी सोडाव्यात, अशी मागणी आम्ही केली आहे. परंतु काँग्रेस यावर काहीही बोलण्यास तयार नाही. आ. विरेंद्र जगताप यांच्या दबावामुळे काँग्रेस अचलपूरची जागा रिपाइंला सोडत नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. दर्यापूर व अचलपूर या दोन जागा रिपाइंला न सोडल्यास काँग्रेसला मोठे नुकसान होईल. आघाडीतून बाहेर पडून वंचित बहुजन आघाडीसोबत जाण्याचाही आपला विचार असल्याचेही त्यांनी सांगितले. या दोन जागा सोडत असतील तरच काँग्रेससोबत आघाडीबाबत चर्चा होईल, अन्यथा आम्ही आघाडीतून बाहेर पडू आणि अमरावती जिल्ह्यातील ८ मतदारसंघासह महाराष्ट्रातील ५० जागा लढवू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.बच्चू कडू यांच्याविरुद्ध लढण्यास तयारडॉ. राजेंद्र गवई यांनी सांगितले की, अचलपूर या विधानसभा मतदारसंघातून आ. बच्चू कडू हे सातत्याने निवडून येतात. कॉंग्रेस ही जागा सातत्याने हरत आहे. आ. कडू यांच्यासारख्या तगड्या उमेदवाराविरुद्ध मी स्वत: लढण्याचे आव्हान स्वीकारले आहे. परंतु काँग्रेस मला हे आव्हान स्वीकारू देण्यासही तयार नसल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :PoliticsराजकारणMediaमाध्यमे