शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

राजस्थानच्या 'फलोदी'मुळे सट्टा बाजारात उलटफेर; त्यात पाच राज्यांच्या एक्झिट पोलची भर

By नरेश डोंगरे | Updated: November 30, 2023 22:41 IST

क्रिकेटमध्ये गुंतलेल्या सट्टा बाजाराची राजकीय रिंगणातही उडी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : आतापर्यंत क्रिकेटमध्ये गुंतलेल्या सट्टा बाजाराने आज राजकीय रिंगणातही उडी घेतली आहे. एकीकडे पाच राज्यांत झालेल्या निवडणुकांचा निकाल कसा असेल, त्यासंबंधाने विविध वाहिन्यांवर एक्झिट पोल जाहीर झाले असतानाच 'फलोदी'नेही गेम उघड करताच सट्टा बाजार कमालीचा गरम झाला आहे.

महाराष्ट्रात 'भेंडवळ' सुपरिचित आहे. वर्षानुवर्षांपासून ज्याप्रमाणे भेंडवळ मांडली जाते आणि पीकपाण्याचे भाकित केले जाते त्याचसारखे राजस्थानमधील फलोदित राजकारण आणि निवडणुकांचा सट्टा खुलतो. देशभरातील सटोडे फलोदीच्या भाकितांवर डोळे बंद करून विश्वास करतात आणि सट्टा लावतात.

विशेष म्हणजे आतापर्यंत सट्टाबाजार आधी विश्वचषक आणि टी-२०त गुंतला होता. मात्र, आज एक्झिट पोल आणि फलोदीने आकडे जाहीर करताच सट्टा बाजारानेही आपली दुकानदारी सुरू केली आहे.

एकीकडे एक्झिट पोलमधून राजस्थानमध्ये भाजपला ११५ ते ११७, तर काँग्रेसला ६८ ते ७० सिट दाखविल्या आहेत. दुसरीकडे हेच आकडे अधोरेखित करून फलोदीने पाच राज्यांत फक्त आणि फक्त राजस्थानमध्येच बीजेपी फेवर ४५-५५चा रेट देऊन देऊन बीजेपीची क्लियरकट घरवापसी सांगितली आहे. सायंकाळी हा रेट येताच सट्टाबाजार खुलला अन् लगवाडी खयवाडीही सुरू झाली.

बाकी राज्याचे सेशन रेट

विविध वृत्त वाहिन्यांवर आलेल्या पाच राज्यातील पक्षीय बलाबलांचा अंदाज लक्षात घेत सट्टा बाजाराने आपले गणित पुढे केले आहे. त्यानुसार, रात्री ८ वाजेपर्यंत सट्टा बाजाराने केवळ संभाव्य सिटांचा 'खावो या लगाओ' (खयवाडी किंवा लगवाडी)चे सेशन रेट दिले आहेत. त्यानुसार, छत्तीसगड काँग्रेस ५१ - ५३ आणि भाजप ३७-३९, मध्य प्रदेश काँग्रेस ११७-११९ आणि भाजप १०८-१११, तेलंगणा काँग्रेस ६२-६४ असे सेशन रेट दिले आहे. 

मिझोरमकडे दुर्लक्षसट्टा बाजाराने मिझोरमच्या निवडणुकांकडे दुर्लक्ष केले कीकाय अशी शंका निर्माण झाली आहे. मिझोरममध्ये काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही प्रमुख राजकीय पक्ष कमकुवत असल्याचे सटोड्यांचे मत आहे. त्यामुळे लगवाडी करणाऱ्यांची संख्याही किरकोळ असल्याचे बोलले जाते. 

 

टॅग्स :ElectionनिवडणूकSatta Bazarसट्टा बाजारRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकMadhya Pradesh Assembly Electionमध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३