शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

अन् मशाल मोर्चात रात्रभर शहरात फिरल होते राजा ढाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 23:40 IST

त्यावेळी नामांतरणाचे आंदोलन चांगलेच पेटले होते. औरंगाबादच्या आंदोलनाला समर्थन करताना नागपुरातही ५ ऑगस्ट १९७८ रोजी विशाल मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चा परत येत असताना १० नंबर पुलाजवळ पोलिसांनी मोर्चावर गोळीबार केला ज्यामध्ये पाच तरुणांचा मृत्यू झाला होता. या घटनेचा निषेध म्हणून १५ ऑगस्टला काळा स्वातंत्र्य दिन पाळण्याचा निर्णय दलित पँथरने घेतला. त्याअंतर्गत मशाल मोर्चा काढल्या जाणार होता व याचे नेतृत्व राजा ढाले यांच्याकडे होते. पोलीस आयुक्तांनी परवानगी नाकारली व कार्यकर्त्यांना अटक करण्याचा इशारा दिला. मात्र १४ ऑगस्टच्या रात्री राजा ढाले स्वत: हातात मशाल घेऊन मोर्चात सहभागी झाले.

ठळक मुद्देप्रकाश रामटेके यांनी जागविल्या आठवणी : तरुणांमध्ये स्फूर्ती भरणारा पँथर

निशांत वानखेडे/लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : त्यावेळी नामांतरणाचे आंदोलन चांगलेच पेटले होते. औरंगाबादच्या आंदोलनाला समर्थन करताना नागपुरातही ५ ऑगस्ट १९७८ रोजी विशाल मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चा परत येत असताना १० नंबर पुलाजवळ पोलिसांनी मोर्चावर गोळीबार केला ज्यामध्ये पाच तरुणांचा मृत्यू झाला होता. या घटनेचा निषेध म्हणून १५ ऑगस्टला काळा स्वातंत्र्य दिन पाळण्याचा निर्णय दलित पँथरने घेतला. त्याअंतर्गत मशाल मोर्चा काढल्या जाणार होता व याचे नेतृत्व राजा ढाले यांच्याकडे होते. पोलीस आयुक्तांनी परवानगी नाकारली व कार्यकर्त्यांना अटक करण्याचा इशारा दिला. मात्र १४ ऑगस्टच्या रात्री राजा ढाले स्वत: हातात मशाल घेऊन मोर्चात सहभागी झाले. १० हजाराच्यावर तरुण कार्यकर्ते या मशाल मोर्च्यात सहभागी झाले होते. रात्रभर हा मोर्चा शहरात फिरला व पहाटे इंदोरा बुद्ध विहारात त्याचे समापन झाले.दलित पँथरचे संस्थापक, कवी, विचारवंत व साहित्यिक राजा ढाले यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यावेळी पँथरचे विदर्भ संयोजक प्रकाश रामटेके यांनी या लढाऊ पँथरच्या आठवणींना उजाळा दिला. राजा ढाले व नामदेव ढसाळ हे पुढे राहून नेतृत्व करणारे नेते होते. वैयक्तिकरीत्या अतिशय शांत व गंभीर राहणारे राजा ढाले भाषण करताना मात्र प्रचंड आक्रमक असायचे. त्यांनी लेखनाने, भाषणाने व विचाराने तरुणांमध्ये आंबेडकरी चळवळीची स्फूर्ती जागविली होती. प्रत्येक तरुण त्यांच्या बोलण्याने झपाटला होता. कोणत्याही घरात ज्येष्ठ माणसे रिपब्लिकन पार्टीत असली तरी त्या घरातील तरुण मात्र कट्टर पँथर झाला होता. राजा ढाले १९७३ साली पहिल्यांदा नागपूरला आले होते. त्यावेळी गाजलेल्या एरणगाव नरबळी प्रकरणात काढलेल्या मोर्चात नामदेव ढसाळ यांच्यासह ते सहभागी झाले होते. त्यानंतर दलित पँथरच्या विदर्भातील संघटनेत पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी घेतलेल्या बैठकीत ते आले होते व त्यांनीच विदर्भ संयोजक म्हणून आपली निवड केल्याचे रामटेके यांनी सांगितले. १९७५ साली बाबासाहेबांचे विरोधक म्हणून ओळखले जाणारे बाबू जगजीवनराम हे दीक्षाभूमीवर भेटीसाठी आले होते. दलित पँथरने या भेटीला प्रचंड विरोध केला होता. त्यावेळी ‘जगजीवनराम गो बॅक’ अशा घोषणा देत कार्यकर्ते रोडवर उभे होते. सामोर ढाले होते.एका पोलिसाने त्यांच्या अंगावरून बुलेट आणण्याचा प्रयत्न केला पण ते हटले नाही. त्यांना जबर दुखापत झाली होती. ही त्यांची आक्रमकता तरुणांना भावली होती. तरुणांमध्ये आंबेडकरवाद जागविण्याचे काम त्यांनी केले होते. हा पँथर आज हरविल्यासारखे वाटत असल्याची भावना प्रकाश रामटेके यांनी व्यक्त केली.जुन्या पुस्तकांच्या बाजारात तासन्तास घालवायचेआंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते नरेश वाहाने यांनीही राजा ढाले यांच्या आठवणी मांडल्या. जुन्या पुस्तकांच्या बाजारात वाहाने यांचे पुस्तकांचे दुकान होते. ढाले त्यांना ‘दोस्त’ मानायचे. नागपूरला आले की त्यांच्या दुकानात तासन्तास पुस्तक वाचत बसायचे. चळवळीच्या गोष्टी करायचे. समता सैनिक दलातर्फे केतन पिंपळापुरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित पुरस्कारवितरण समारंभात ते आले होते. त्यांची प्रकृती खालावली होती पण आक्रमकता आजही तशीच होती. त्यांचे भाषण आजही स्फूर्ती देणारे आहे. साप्ताहिकाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात त्यांना येण्यासाठी विनंती केली होती. मात्र आता ते कधीही येऊ शकणार नाही. एक लढाऊ पँथर समाजाने कायमचा गमावला आहे.

टॅग्स :Namantar Andolanनामांतर आंदोलनMorchaमोर्चाnagpurनागपूर