शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ‘रेल्वे वीरांगना’ व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 10:11 IST

अनेकदा रेल्वेने महिला एकट्या प्रवास करतात. प्रवासात त्यांना सुरक्षा मिळावी यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने ‘रेल्वे वीरांगणा’ नावाचा व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप तयार केला आहे.

ठळक मुद्देरेल्वे सुरक्षा दलाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनेकदा रेल्वेने महिला एकट्या प्रवास करतात. प्रवासात त्यांना सुरक्षा मिळावी यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने ‘रेल्वे वीरांगणा’ नावाचा व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपमध्ये आरपीएफच्या महिला अधिकारी, कर्मचारी, रेल्वे रनिंग स्टाफमधील कर्मचारी आणि दररोज रेल्वेने ये-जा करणाऱ्या महिलांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे आता महिलांचा रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.रेल्वे बोर्डाने २०१८ हे वर्ष महिला प्रवासी सुरक्षा वर्ष म्हणून जाहीर केले आहे. यानिमित्त भारतीय रेल्वेतर्फे महिला प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. नागपुरात अलीकडेच महिलादिनी अजनी स्थानक पूर्णत: महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुपूर्द करण्यात आले. संपूर्ण महिलांतर्फे संचालित होणारे हे मध्य भारतातील पहिलेच रेल्वे स्थानक आहे. आता आरपीएफचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योतिकुमार सतिजा यांच्या पुढाकाराने ‘रेल्वे वीरांगना’ नावाचा व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप तयार करण्यात आला आहे. रेल्वे गाडीत किंवा रेल्वेस्थानकावर महिलांसबोत काही अनुचित प्रकार होत असेल तर ग्रुपच्या माध्यमातून मदतीसाठी संवाद साधता येणार आहे. महिलांनी ग्रुपवर दिलेल्या तक्रारीची तातडीने दखल घेतली जाणार आहे. ग्रुपमुळे महिला प्रवासी आणि आरपीएफ यांच्यात थेट संवाद राहील. महिला प्रवाशांबाबत काही सूचना असल्यास त्यासुद्धा या ग्रुपवर करता येणार आहेत. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील विविध स्थानकांशी संबंधित जवळपास ८५ महिला प्रवाशांचा सध्या या ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला आहे.यामुळे रेल्वेतील महिला प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित होण्यास मदत होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे