शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार, दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 22:07 IST

रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दोन दलालांना रेल्वे सुरक्षा दलाने सोमवारी रंगेहात अटक केली. त्यांच्याकडून ७०२० रुपये किमतीच्या दोन आरक्षणाच्या तिकिटांसह २८७४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ठळक मुद्देआरपीएफची कारवाई : २८७४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दोन दलालांना रेल्वे सुरक्षा दलाने सोमवारी रंगेहात अटक केली. त्यांच्याकडून ७०२० रुपये किमतीच्या दोन आरक्षणाच्या तिकिटांसह २८७४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.रेल्वे सुरक्षा दलाच्या गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गुन्हे शाखेचे निरीक्षक एस. के. मिश्र, निरीक्षक छेदीलाल, उपनिरीक्षक शिवराम सिंह, उपनिरीक्षक आर. के. यादव, आरपीएफ जवान प्रदीप कुमार यांनी शंकरनगर पेट्रोल पंपाच्या बाजूला असलेल्या पोस्ट आॅफिस कार्यालयात सकाळी १० वाजता धाड टाकली. तेथे रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करीत असलेल्या दोन दलालांना अटक केली. त्यांनी आपले नाव अनुराग प्रेमप्रकाश जालान (४३) रा. टीबी हॉस्पिटलजवळ, गोपालजी अपार्टमेंट असे सांगितले. त्याने गरजू प्रवाशांना ४०० ते ५०० रुपये अधिक घेऊन तिकिट पुरवित असल्याची माहिती दिली. त्याच्याजवळून आरक्षणाचे थर्ड एसीचे २२६० रुपये किमतीचे तिकीट, मोबाईल ८ हजार, रोख १७२५ रुपये असा एकूण ११९८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोस्ट ऑफिसच्या बाहेर एक व्यक्ती तिकीट काढून जाताना दिसली. तिची चौकशी केली असता त्या व्यक्तीने आपले नाव कुणाल चंद्रशेखर हलमारे (२९) असे सांगितले. गरजू प्रवाशांना कमिशन घेऊन तिकीट पुरवित असल्याचे त्याने सांगितले. त्याच्याजवळून ४७६० रुपये किमतीचे तिकीट, मोबाईल १२ हजार असा एकूण १६७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त भवानी शंकर नाथ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरticketतिकिटArrestअटक