शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळी अधिवेशनासाठी रेल्वे सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 23:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन बुधवारपासून उपराजधानीत सुरू होत असून त्यासाठी राज्यभरातून येणाऱ्या मंत्री, आमदार, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुविधेसाठी दुरांतो, सेवाग्राम, महाराष्ट्र व अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसला प्रत्येकी एक अतिरिक्त द्वितीय श्रेणी वातानुकूलित कोच जोडण्यात येणार आहे. याशिवाय या कोचमध्ये संबंधितांना प्राधान्यक्रमाने आरक्षण देण्यात येणार आहे.विधिमंडळाचे अधिवेशन असल्याने मंत्रालयातील संपूर्ण यंत्रणा ...

ठळक मुद्देगाड्यांना अतिरिक्त कोच : मंत्री, आमदारांना प्राधान्याने मिळणार आरक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन बुधवारपासून उपराजधानीत सुरू होत असून त्यासाठी राज्यभरातून येणाऱ्या मंत्री, आमदार, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुविधेसाठी दुरांतो, सेवाग्राम, महाराष्ट्र व अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसला प्रत्येकी एक अतिरिक्त द्वितीय श्रेणी वातानुकूलित कोच जोडण्यात येणार आहे. याशिवाय या कोचमध्ये संबंधितांना प्राधान्यक्रमाने आरक्षण देण्यात येणार आहे.विधिमंडळाचे अधिवेशन असल्याने मंत्रालयातील संपूर्ण यंत्रणा उपराजधानीत दाखल झाली आहे. मंत्री, आमदार, अधिकाºयांचे आगमन सुरू झाले आहे. त्यांच्या सुविधेसाठी सोमवारपासून रेल्वेगाड्यांना अतिरिक्त कोच लावणे सुरू झाले आहे. शनिवार, रविवार सुटी असल्याने मंत्री, आमदार मतदारसंघात परत जातात. त्यांच्या सुविधेसाठी रेल्वेगाड्यांना अतिरिक्त कोच जोडण्यात येत आहेत. बुधवारी सेवाग्राम एक्स्प्रेस, दुरांतोला, ६ व ७ जुलै रोजी सेवाग्राम एक्स्प्रेसला, १३ जुलै रोजी चारही गाड्यांना अतिरिक्त कोच लावण्यात येतील. त्यानंतर १४ व १५ जुलैला सेवाग्राम एक्स्प्रेसला, २० जुलै रोजी चारही गाड्यांना, २१ जुलैला सेवाग्राम एक्स्प्रेस, २३ जुलैला सेवाग्राम एक्स्प्रेस व दुरांतोला अतिरिक्त कोच जोडण्यात येणार आहे. २७ जुलैपर्यंत संबंधित रेल्वेगाड्यांना अतिरिक्त कोच लावण्याचे नियोजन मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने केले आहे. या अतिरिक्त कोचमध्ये मंत्री, आमदारांसह अधिकारी, कर्मचाऱ्यांना या कोचमध्ये प्राधान्यक्रमाने आरक्षण देण्यात येणार असून, बर्थ शिल्लक राहिल्यास सर्वसामान्य प्रवाशांना बर्थ उपलब्ध करून देण्यात येतील.

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८railwayरेल्वे