शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरची औद्योगिक वसाहत बुटीबोरीत ‘रेल नीर’ प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 11:40 IST

आयआरसीटीसीने बुटीबोरीत रेल नीर प्लँटचे काम पूर्ण केले असून आगामी तीन ते चार महिन्यात औपचारिकता पूर्ण होताच या प्रकल्पात पाण्याचे उत्पादन सुरू होणार आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्रातील दुसरा प्रकल्पप्रवाशांना मिळणार बाटलीबंद पाणी

दयानंद पाईकराव।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वेत प्रवास करताना अनेक प्रवासी पाण्याच्या बाटल्या विकत घेतात. मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्यामुळे अवैध व्हेंडरकडून रिकाम्या बाटल्यात दूषित पाणी भरून त्याची विक्री होते. परंतु आता नागपुरातून चारही दिशांना जाणाऱ्या रेल्वेगाड्यातील प्रवाशांचा शुद्ध पाण्याचा प्रश्न कायम मार्गी लागला आहे. आयआरसीटीसीने बुटीबोरीत रेल नीर प्लँटचे काम पूर्ण केले असून आगामी तीन ते चार महिन्यात औपचारिकता पूर्ण होताच या प्रकल्पात पाण्याचे उत्पादन सुरू होणार आहे.तत्कालीन रेल्वेमंत्री पवन कुमार बन्सल यांनी २०१३-१४ च्या अर्थसंकल्पात नागपुरात रेल नीर बॉटलिंग प्लँट सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर अनेकदा आयआरसीटीसीचे अधिकाऱ्यांनी नागपुरात येऊन या प्रकल्पासाठी जागेचा शोध घेतला. अखेर बुटीबोरी येथे हा प्रकल्प सुरु करण्याचा निर्णय आयआरसीटीसीने घेतला. घोषणा झाल्यानंतर चार वर्षांनी हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे. बुटीबोरी येथे १० हजार चौरसफुटांवर रेल नीर प्रकल्प साकारण्यात आला आहे. यापूर्वी महाराष्ट्रात मुंबई येथे आयआरसीटीसीने रेल नीरचा प्रकल्प सुरू केला होता. या प्रकल्पातून मोजक्याच रेल्वेस्थानकांना पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागपुरात रेल नीर प्रकल्प साकारण्यात आला. बुटीबोरीच्या रेल नीर प्रकल्पात दररोज ७२ हजार लिटर शुद्ध पाण्याची निर्मिती होणार आहे. नागपुरातून दिवसाकाठी १२० ते १३५ रेल्वेगाड्यांचे आवागमन होते. यात प्रवाशांची संख्या ३५ ते ४० हजार आहे. रेल नीर प्रकल्पामुळे आता या प्रवाशांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नागपूरसह सेवाग्राम, वर्धा, चंद्रपूर, बल्लारशाह, बैतुल, घोडाडोंगरी, आमला या रेल्वेस्थानकांना या रेल नीर प्रकल्पातून शुद्ध पाणी पुरविण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

जर्मनीवरून मागविल्या मशीनबुटीबोरी येथील रेल नीर प्लँटसाठी जर्मनीवरून मशीन बोलाविण्यात आल्या आहे. अत्याधुनिक या मशीनद्वारे पाणी स्वच्छ करून ते बाटलीबंद करण्यात येणार आहे. त्यामुळे नागपूरवरून चारही दिशांना जाणाºया रेल्वेगाड्यातील प्रवाशांना आता शुद्ध पिण्याचे पाणी प्रवासात उपलब्ध होणार आहे.औपचारिकता पूर्ण होताच प्रकल्प सुरू‘बुटीबोरी येथील आयआरसीटीसीचा रेल नीर प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. औपचारिकता पूर्ण होताच उन्हाळ्यापूर्वी आगामी तीन ते चार महिन्यात या प्रकल्पात शुद्ध पाण्याची निर्मिती सुरु होईल.’-पिनाकीन मोरावाल, जनसंपर्क अधिकारी, आयआरसीटीसी

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर