शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात फातोडेच्या जुगार अड्ड्यावर छापा : नऊ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 21:25 IST

अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फुटाळा परिसरात सुरू असलेल्या कुख्यात गुन्हेगार संजय फातोडे याच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी गुरुवारी रात्री छापा घातला. फातोडेचा साथीदार पंकज ऊर्फ भल्ला बालाजी आत्राम याच्यासह नऊ जुगारी तेथे आढळले.

ठळक मुद्देपरिमंडळ दोनच्या पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फुटाळा परिसरात सुरू असलेल्या कुख्यात गुन्हेगार संजय फातोडे याच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी गुरुवारी रात्री छापा घातला. फातोडेचा साथीदार पंकज ऊर्फ भल्ला बालाजी आत्राम याच्यासह नऊ जुगारी तेथे आढळले. पोलिसांनी त्यांना अटक करून त्यांच्याकडून रोख रक्कम आणि साहित्यासह ९६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.फातोडे हा कुख्यात गुंड असून त्याला यापूर्वी पोलिसांनी मोक्कासुद्धा लावला आहे. एक वर्षापूर्वी त्याला नागपुरातून हद्दपार करण्यात आले होते. तेव्हापासून फातोडेचा जुगार अड्डा कुख्यात गुंड पंकज भल्ला सांभाळतो. फुटाळा तलावाजवळ एका गल्लीत भल्ला आणि फातोडे हा जुगार अड्डा चालवत असल्याची माहिती परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त विनिता साहू यांना मिळाली. त्यावरून त्यांनी गुरुवारी रात्री १० च्या सुमारास विशेष पथकाला जुगार अड्ड्यावर छापा मारण्याचे आदेश दिले. पोलीस अड्ड्यावर पोहचले यावेळी तेथे कुख्यात फातोडे, पंकज ऊर्फ भल्ला, सुमित कल्लू चौधरी, राजू बाबुराव किरनाके, भगवंत डोमाजी सोनवाने, अंकुश हरिदास बनसोड, सुरेश गणपतराव खापेकर, शालिक रामगीन यादव आणि हरीश छोटेलाल यादव हे तास पत्त्यावर जुगार खेळताना सापडले. त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी तेथून रोख रक्कम, वाहन, मोबाईल आदीसह एकूण ९६ हजार, २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अंबाझरी पोलीस ठाण्यात उपरोक्त आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.पळण्याची संधी नाही!ज्या ठिकाणी हा जुगार अड्डा चालतो. तेथून पळून जाण्यासाठी अनेक गल्ल्या आहेत. मात्र, पोलिसांनी जुगार अड्ड्याला चोहोबाजूने घेराव घातला होता. त्यामुळे आरोपींना पळून जाण्याची संधीच मिळाली नाही. पोलीस उपायुक्त विनिता शाहू यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय राजेंद्र घुगे, नायक रेमंड, गिट्टीखदान मधील पोलीस उपनिरीक्षक साजिद अहमद, युवराज भोसले, नायक इम्रान, संतोष, पोलीस शिपाई, आशिष अजय, विजेंद्र आणि सुनील यांनी ही कामगिरी बजावली.

टॅग्स :raidधाडNagpur Policeनागपूर पोलीस