शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  मेकअप स्टुडिओच्या आड आढळला कुंटणखाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 00:44 IST

गांधीसागर तलावाजवळ एका सलून आणि मेकअप स्टुडिओच्या नावाखाली चालणाऱ्या कुंटणखानावर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा घातला. वेश्याव्यसाय करणाऱ्या चार जणी या छाप्यात पोलिसांच्या हाती लागल्या. हा कुंटणखाना चालविणाऱ्या एका महिलेसह दोघांना पोलिसांनी अटक केली.

ठळक मुद्देवेश्याव्यवसाय करणाऱ्या चार तरुणी सापडल्या : गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गांधीसागर तलावाजवळ एका सलून आणि मेकअप स्टुडिओच्या नावाखाली चालणाऱ्या कुंटणखानावर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा घातला. वेश्याव्यसाय करणाऱ्या चार जणी या छाप्यात पोलिसांच्या हाती लागल्या. हा कुंटणखाना चालविणाऱ्या एका महिलेसह दोघांना पोलिसांनी अटक केली. अंजली शहा आणि लोकेश रोहिणीप्रसाद मिश्रा (वय ३३, रा. वेदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.गांधीसागर तलावाजवळ अंजली आणि लोकेशने काही दिवसांपूर्वी बार्बी सलून अ‍ॅन्ड ब्राईडल मेकअप स्टुडियो सुरू केला होता. तेथे हे दोघे चक्क कुंटणखाना चालवित होते. त्याची माहिती कळताच गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा पथकाच्या पोलीस निरीक्षक मीना जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कारवाईसाठी सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तेथे शनिवारी रात्री पोलिसांनी ग्राहक पाठविले. अंजलीने त्याला दोन हजारांची मागणी करून वेश्याव्यवसाय करणाऱ्या चार तरुणी दाखवल्या. ग्राहकाने एका तरुणीला आतल्या रूममध्ये नेल्यानंतर पोलिसांना विशिष्ट प्रकारे इशारा दिला. त्यावरून गुन्हे शाखेच्या पथकाने तेथे छापा मारला. यावेळी चार तरुणींसह हा कुंटणखाना चालविणारे अंजली आणि लोकेश पोलिसांच्या हाती लागले. पोलिसांनी त्यांना अटक केली. या प्रकरणी गणेशपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील चौकशी सुरू आहे. जेथे हा कुंटणखाना चालत होता, ते स्थळ पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आहे, हे विशेष!

टॅग्स :sex crimeसेक्स गुन्हाraidधाड