शहरं
Join us  
Trending Stories
1
'नोबेल समितीने शांती निवडण्याऐवजी राजकारण केलं', ट्रम्प यांना डावलताच 'व्हाईट हाऊस'चा थयथयाट
2
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
3
आशिया कपची ट्रॉफी भारताला मिळूच देणार नाही, मोहसीन नक्वींनी आता खेळली अशी चाल 
4
‘मला तुझ्याकडे बोलावून घे’, विरहाने व्याकूळ झालेल्या शेफाली जरीवालाच्या पतीची भावूक पोस्ट, चाहते चिंतित  
5
नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप
6
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
7
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
8
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
9
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
10
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
11
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?
12
आठ युद्धं थांबवली तरी पुरस्कार समितीने डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल का नाकारला? समोर येताहेत ही कारणं
13
"मुंबईतील भूखंड उद्योगपतींना कवडीमोल दराने देण्याचा महायुती सरकारचा सपाटा, तर सर्वसामन्यांच्या घरांकडे दुर्लक्ष’’, काँग्रेसचा आरोप
14
सात युद्धं थांबवल्याच्या 'बढाया' मारणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना ठेंगा; 'शांततेचं नोबेल' लोकशाहीवादी मारिया मचाडो यांना
15
IND vs WI 2nd Test Day 1 Stumps: 'ओपनिंग डे'ला टीम इंडियाचा 'यशस्वी' शो! साई सुदर्शनही चमकला; पण...
16
'बदला घेणारच'; भैय्या गायकवाडची शिवीगाळ करत धमकी, टोलनाक्यावर बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
17
Bobby Darling : "मी परत आलेय, मला एक चांगला रोल द्या", बॉबी डार्लिंगची विनंती, अवस्था पाहून बसेल मोठा धक्का
18
उल्हासनगरात धोबीघाट रस्त्यावर ६ महिन्यांपासून जलवाहिनी गळती; हजारो लिटर पाणी वाया!
19
Astro Tips: व्यवसायात भरभराट हवीय? फक्त तीन शनिवार करा पिवळ्या मोहरीचा प्रभावी उपाय!
20
शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? सलग दुसऱ्या महिन्यात म्युच्युअल फंडातील पैशांचा ओघ घटला

नागपुरातील नंदनवनमध्ये जुगार अड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 21:33 IST

गुन्हे शाखेच्या युनिट ४ मधील पथकाने नंदनवनमधील दर्शन कॉलनीत चालणाऱ्या एका जुगार अड्ड्यावर छापा घातला. पोलिसांनी येथून १० जुगाऱ्यास जेरबंद केले आणि त्यांच्या ताब्यातून रोख रकमेसह दीड लाखाचा मुद्देमाल जप्त केला.

ठळक मुद्दे१० जुगारी जेरबंद रोख आणि मोबाईलसह दीड लाखाचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुन्हे शाखेच्या युनिट ४ मधील पथकाने नंदनवनमधील दर्शन कॉलनीत चालणाऱ्या एका जुगार अड्ड्यावर छापा घातला. पोलिसांनी येथून १० जुगाऱ्यास जेरबंद केले आणि त्यांच्या ताब्यातून रोख रकमेसह दीड लाखाचा मुद्देमाल जप्त केला. शुक्रवारी दुपारी ३.३० च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.दर्शन कॉलनीतील श्रीराम उपासे नामक व्यक्तीच्या घराच्या दुसऱ्या माळ्यावर गेल्या अनेक दिवसापासून जुगार अड्डा भरविला जात होता. त्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट ४ चे प्रमुख पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम यांना कळाली. त्यावरून त्यांनी शुक्रवारी दुपारी ३.३० च्या सुमारास आपल्या सहकाऱ्यांसह उपासेच्या घरी चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर छापा घातला. यावेळी तिथे १० जुगारी जुगार खेळताना सापडले. पोलिसांनी त्यांच्याकडून रोख १५ हजार ७०० रुपये, आठ मोबाईल आणि तासपत्ते असा एकूण १ लाख ४८ हजार ७०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.सर्वत्र कोरोनाची दहशत पसरली असताना हे जुगारी एकमेकाला खेटून छोट्या रूममध्ये जुगार खेळत असल्याचे धक्कादायक चित्र या कारवाईच्या दरम्यान पोलिसांनी बघितले. सर्व आरोपींविरुद्ध नंदनवन पोलीस ठाण्यात जमावबंदी आणि जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलमानुसार कारवाई करण्यात आली. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. नीलेश भरणे, उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने, सहायक आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम, सहायक पोलीस निरीक्षक किरण चौगुले, हवालदार बट्टूलाल पांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बजावली.निखिल जीवतोडे, महेश बाविस्कर, नीलेश चिंचवडकर, अमोल शिंगणे, वसीम शेख गफार शेख, राजेश ढोबळे, अनिकेत गजभिये, रोशन अलोणे, किशोर डोरले आणि मंगेश रोकडे अशी अटक करण्यात आलेल्या जुगाऱ्याची नावे आहेत.