शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात बनावट दारूच्या कारखान्यावर धाड; देशीला विदेशीचे लेबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 10:18 IST

नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बनावट दारूच्या कारखान्यावर रविवारी सायंकाळी गुन्हे शाखेच्या पथकाने छापा घातला.

ठळक मुद्देहुडकेश्वरमध्ये गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बनावट दारूच्या कारखान्यावर रविवारी सायंकाळी गुन्हे शाखेच्या पथकाने छापा घातला. या कारखान्यात देशी (संत्रा) दारूमध्ये वेगळे रसायन मिसळवून ती विदेशी दारूच्या बाटल्यात भरली जात होती. पोलिसांनी तेथून तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला.बहादुराच्या टेकअप सिटीत वर्धा जिल्ह्यातील पराग पुरुषोत्तम पिंजरकर (वय ३२, रा. हिंगणघाट) आणि सोनल कोल्हटकर (रा. भद्रावती, जि. चंद्रपूर) हे दोघे मागच्या वर्षीपासून बनावट दारू तयार करण्याचा कारखाना चालवित होते. संत्रा दारूच्या बाटल्या रिकाम्या करून त्यात विशिष्ट रसायन मिसळायचे. त्याची चव आणि रंग बदलल्यानंतर ती वेगवेगळ्या बाटल्यात भरायचे. त्या बाटल्यांवर विदेशी कंपनीच्या मद्याचे लेबल चिपकवायचे आणि त्या बाटल्या बॉक्समध्ये भरून बाजारात विकायच्या, असा त्यांचा गोरखधंदा सुरू होता. ही माहिती कळाल्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ढेरे, सहायक निरीक्षक धर्मेंद्र आवारे, उपनिरीक्षक सुनील राऊत, हवलदार राजेश यादव, अरुण चांदणे, रवी शाहू, मंगेश लांडे, प्रितम ठाकूर, नावेद शेख आणि फराज खान यांनी रविवारी सायंकाळी या कारखान्यावर छापा मारला. यावेळी आरोपी सोनल कोल्हटकर पळून गेला. पराग पिंजरकरला अटक करून पोलिसांनी कारखान्यावर असलेली देशी दारू, बॉटल पॅकेजिंगचे साहित्य, मिनरल वॉटरचे बॉक्स आणि विविध कंपन्यांचे लेबल तसेच उपकरणे असा एकूण २ लाख, ९२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पिंजरकरला अटक करण्यात आली असून, फरार कोल्हटकरचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :crimeगुन्हे