शहरं
Join us  
Trending Stories
1
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
2
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
3
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
4
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
5
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
6
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
7
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
8
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
9
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
10
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
11
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
13
स्ट्रगलच्या काळात राजकुमार रावची झालेली १० हजारांची फसवणूक, असं काय घडलं होतं?
14
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
15
"फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य’’, एक्झिट पोलनंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला
16
आम्हाला फक्त भारताविरूद्धच नाहीतर वर्ल्ड कप देखील जिंकायचाय - बाबर आझम
17
"कठीण प्रसंग येतातच, मी पळ काढणार नाही", Hardik Pandya ने सांगितला खडतर प्रवास
18
कंगना, कन्हैया, संबित पात्रा, अन्नामलाई, विशाल पाटील यांच्या हॉट सिटवर असा आहे एक्झिट पोल
19
'मालवणच्या समुद्रकिनारी तब्बूचा फोन...', छाया कदम यांनी सांगितला मजेशीर किस्सा
20
इंडिया आघाडीला महाराष्ट्र, बिहार, कर्नाटकात धक्कादायक आकडे; एक्झिट पोलमध्ये विरोधी पक्षांनी 'या' राज्यात मारली बाजी

राहुल गांधी यांची गुरुवारी सभा : कस्तूरचंद पार्क सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2019 8:17 PM

अ.भा. काँग्रेस समितीचे अध्यक्ष खा. राहुल गांधी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरातून विदर्भातील काँग्रेसजनांना संदेश देणार आहेत. लोकसभेच्या प्रचारासाठी त्यांची विदर्भातील पहिली सभा आज, गुरुवारी सायंकाळी ५ वाजता येथील कस्तूरचंद पार्कवर होत आहे.

ठळक मुद्देकाँग्रेसजन लागले कामाला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अ.भा. काँग्रेस समितीचे अध्यक्ष खा. राहुल गांधी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरातून विदर्भातील काँग्रेसजनांना संदेश देणार आहेत. लोकसभेच्या प्रचारासाठी त्यांची विदर्भातील पहिली सभा आज, गुरुवारी सायंकाळी ५ वाजता येथील कस्तूरचंद पार्कवर होत आहे.एकेकाळी विदर्भ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. २०१४ च्या निवडणुकीत मात्र हा बालेकिल्ला ढासळला. काँग्रेसची एकही जागा निवडून आली नाही. मात्र, गेल्या दोन वर्षात राहुल गांधी यांनी विदर्भावर बरेच लक्ष दिले. सेवाग्राम येथे अ.भा. काँग्रेस समितीची बैठक घेत एक संदेश देण्याचा प्रयत्न केला. आता आपल्या जाहीरनाम्यात ‘न्याय’, २२ लाख सरकारी नोकऱ्या अशी आश्वासने घेऊन राहुल गांधी विदर्भात येत आहेत. त्यामुळे काँग्रेसजनांमध्ये उत्साह आहे.गुरुवारच्या नागपूरच्या सभेनंतर शुक्रवारी, ५ एप्रिल रोजी चंद्रपूर व वर्धा येथेही राहुल गांधी यांची जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे नागपूरच्या सभेसाठी शेजारच्या जिल्ह्यातून लोक येण्याची शक्यता नाही. त्यामुळे नागपूर शहर व ग्रामीण मधून जास्तीत जास्त लोक सभेला आणण्यासाठी, सभेला अपेक्षित गर्दी होण्यासाठी स्थानिक काँग्रेस नेते कामाला लागले आहेत. नागपूरच्या सभेला प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई(गवई गट), पीरिपा (कवाडे गट), शेकाप, बहुजन विकास आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, युवा स्वाभिमानी पक्ष, भीमसेना, युनायटेड रिपब्लिकन पक्ष, गणराज्य संघ, डेमोक्रेटिक अलायन्स, महाराष्ट्र मुस्लिम संघ, आंबेडकर विचार मंच, महाराष्ट्र परिवर्तन सेना, स्वाभिमानी रिपाई, रिपाई(खरात गट) या सर्वांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीKasturchand Parkकस्तूरचंद पार्क