शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी यांचे आभारच मानायला हवे; सावरकर गौरव यात्रा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2023 22:12 IST

Nagpur News ‘मरता क्या नही करता’ व ‘अंधेरी रात में दिया तेरे हात में’ अशी राहुल गांधी यांची अवस्था झाली असल्याचा चिमटा गडकरी यांनी काढला.

नागपूरः  राहुलसारख्या लोकांनी कितीही अपमान केला तरी सावरकरांची महानता कमी होत नाही. मात्र राहुल गांधी यांच्यामुळे सावरकरांचे चारित्र्य घरांघरात व नवीन पिढीपर्यंत पोहोचविण्याची संधी मिळाली आहे. त्यासाठी त्यांचे आभारच मानायला हवे. त्यांनी असेच काम करायला हवे. ‘मरता क्या नही करता’ व ‘अंधेरी रात में दिया तेरे हात में’ अशी राहुल गांधी यांची अवस्था झाली असल्याचा चिमटा गडकरी यांनी काढला. नागपुरात सावरकर गौरव यात्रेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. भाजप अजिबात जातीयवादी नाही व आम्हाला भेदाभेददेखील मान्य नाही. कॉंंग्रेसचे लोक धर्मनिरपेक्षतेच्या मोठमोठ्या बाता करतात, मग जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी व राहुल गांधी यांच्या मृत्यूनंतर ब्राह्मण बोलवून मंत्राग्नी का दिला, असा प्रश्न गडकरी यांनी उपस्थित केला.

शंकरनगर चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याजवळ आयोजित समारोप कार्यक्रमाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, खा.सुधांशु त्रिवेदी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे , राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, माजी खासदार अजय संचेती, खा.कृपाल तुमाने, विदर्भ प्रांत संघचालक राम हरकरे, राजे मुधोजी भोसले इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होत्या. 

महात्मा गांधींना सावरकरांची देशभक्ती कळली, आजच्या गांधींना कधी कळणार ?यावेळी सुधांशु त्रिवेदी यांनीदेखील राहुल गांधी यांच्यावर इतिहासातील दाखले देत टीका केली. महात्मा गांधी यांनी हरिजन या त्यांच्या वृत्तपत्रात सच्चा, प्रखर व साहसी देशभक्त अशा शब्दांत सावरकरांचे कौतुक केले होते. सावरकरांना इंग्रजांचे मनसुबे माझ्याअगोदर व जास्त प्रमाणात कळाले असेदेखील ते म्हणाले होते. महात्मा गांधींना सावरकरांची देशभक्ती कळली होती, मात्र आजच्या गांधींना कधी कळणार, असा सवाल त्रिवेदी यांनी उपस्थित केला. स्वातंत्र्यलढ्यात कॉंग्रेसच्या एकाही नेत्याला काळ्यापाण्याची शिक्षा, फाशी झाली नाही किंवा लाला लाजपतराय वगळता एकही नेता गोळीबार किंवा लाठीमारात शहीद झाला नाही. कॉंग्रेसचे नेते दिवसा आंदोलन करायचे व रात्री इंग्रजांसोबत जेवायचे. मात्र स्वातंत्र्याचे श्रेय मात्र तेच घेऊन गेले. मुळात ब्रिटीशकालीन भारतीय सैन्यात असंतोष पसरला होता व ही बाब आपल्याला महागात पडेल याच विचारातून इंग्रजांनी भारताला स्वातंत्र्य दिले, असा दावा त्रिवेदी यांनी केला.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकर