शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी क्षणभर आले, आभाळभर ऊर्जा देऊन गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 14:35 IST

अ.भा. काँग्रेस समितीचे अध्यक्ष राहुल गांधी हे धानाच्या एचएमटी वाणाचे संशोधक दादाजी खोब्रागडे यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी आज सकाळी नागपुरात विमानाने आले.

ठळक मुद्देनागपूर विमानतळावर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अ.भा. काँग्रेस समितीचे अध्यक्ष राहुल गांधी हे धानाच्या एचएमटी वाणाचे संशोधक दादाजी खोब्रागडे यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी आज सकाळी नागपुरात विमानाने आले. विमानतळावरूनच ते थेट नागभीड तालुक्यातील नांदेड या गावी हेलिकॉप्टरने रवाना होणार होते. पण बाहेर त्यांच्या भेटीसाठी कार्यकर्ते ताटकळत उभे असल्याचे कळताच त्यांनी लगेच दखल घेतली. विमानतळाच्या प्रवेशद्वारावर लगबगीने आले. नमस्कार घेत, हात उंचावून कार्यकर्त्यांना अभिवादन केले व निघून गेले. त्यांच्या क्षणभर येण्याने कार्यकर्त्यांना मात्र आभाळभर आनंद व ऊर्जा मिळाली.राहुल गांधी यांचे सकाळी ११ वाजता विशेष विमानाने नागपूर विमानतळावर आगमन झाले. त्यांच्यासोबत महाराष्ट्र प्रभारी खा. मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील होते. विमातळावर माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, शहर अध्यक्ष विकास ठाकरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, अनंतराव घारड, डॉ. बबनराव तायवाडे, नाना गावंडे, सुरेश भोयर, सुनिता गावंडे, अभिजित वंजारी, उमाकांत अग्नीहोत्री, अतुल कोटेचा, विशाल मुत्तेमवार, माजी आमदार सेवक वाघाये, एस.क्यु. जमा, शेख हुसैन, संजय महाकाळकर, तक्षशिला वाघधरे, प्रज्ञा बडवाईक, कुंदा राऊत, मुजिब पठाण, गिरीश पांडव, प्रमोदसिंग ठाकूर, राजेश कुंभलकर, रवी घाडगे पाटील आदींनी त्यांचे स्वागत केले.या वेळी आपण राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच नागपुरात आल्यामुळे बाहेर कार्यकर्ते मोठ्या संख्येने आपल्या स्वागतासाठी जमले असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांना दिली व बाहेर कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी येण्याची विनंती केली. राहुल गांधी यांनी लगेच विनंती मान्य केली व कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी विमानतळाच्या प्रवेश द्वारावर आले. सुरक्षेच्या कारणावरून त्यांना विमानतळाबाहेर येता आले नाही. पण काचेच्या प्रवेशद्वाराआडून त्यांनी हात उंचावून कार्यकर्त्यांना अभिवादन केले. हात जोडत आभार व्यक्त केले. त्यांची एक झलक पाहून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. कार्यकर्त्यांनी ढोलताशांचा निनाद करीत राहुल गांधी यांच्या सन्मानार्थ जोरदार घोषणाबाजी केली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी